विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपाकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी

254 0

राज्यपालांकडून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्यात आले असून त्यात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपने आज राहुल नार्वेकर यांच्या नावाला पसंती दिली असून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे.

राहुल नार्वेकर हे शिवसेनेत होते, त्यानंतर ते राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत होते. आता ते भाजपाचे आमदार आहेत. असे असताना त्यांचे सासरे हे विधान परिषदेचे सभापती आहेत. रामराजे नाईक निंबाळकर हे सभापती आहेत. सध्या ते विधान परिषदेवर पुन्हा निवडून आले आहेत.

शनिवारी आणि रविवारी म्हणजे 2 आणि 3 जुलैला होणारे अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं आहे. हे अधिवेशन आता 3 आणि 4 जुलै म्हणजे येत्या रविवार आणि सोमवारी होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नव नियुक्त सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी हे अधिवेशन बोलावलं आहे. याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची देखील निवड केली जाणार आहे.

भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांनी विधान सभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्र विधानसभेचे ३ जुलैपासून दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्यात आले आहे. या अधिवेशनात एकनाथ शिंदे सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. राहुल नार्वेकर हे कुलाब्याचे आमदार आहेत. २०१४ मध्ये त्यांना शिवसेनेने लोकसभेला उमेदवारी नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी मावळ मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. यानंतर ते भाजपात गेले होते.

Share This News

Related Post

कोरोना लसीचा बूस्टर डोस घेणाऱ्यांसाठी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

Posted by - May 13, 2022 0
नवी दिल्ली- परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी दुसरा डोस आणि बुस्टर डोस यामधील अंतर ९ महिन्याहून कमी करत ते ९० दिवसापर्यंत कमी…

मोठी बातमी : सत्यजित तांबेंच्या डोक्यावर काँग्रेस हायकमांडच्या कारवाईची टांगती तलवार ; नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीवरून राजकारण तापले

Posted by - January 16, 2023 0
नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीवरून चांगलेच राजकारण तापले आहे. ऐनवेळी डॉक्टर सुधीर तांबे यांची निवडणुकीतून माघार आणि त्यानंतर त्यांचे…
Pune News

Pune News : मंत्र्याकडून नियमबाह्य कामांसाठी दबाव! निलंबित अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांना लिहीले पत्र; म्हणाले…

Posted by - May 26, 2024 0
पुणे : महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ प्रकरणी आणि विभागातंर्गत आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत पुणे (Pune News) जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा…

जागतिक क्षयरोग दिन 2023 : टीबीचा इशारा देणारी ही 9 चिन्हे, त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका !

Posted by - March 24, 2023 0
जागतिक क्षयरोग दिन 2023 : क्षयरोग (टीबी) हा एक असा आजार आहे जो शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकतो, परंतु…
Uddhav Thackeray

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ दोन शिलेदारांनी सोडली साथ

Posted by - February 27, 2024 0
मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी (Maharashtra Politics) समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आणखी एक मोठा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *