JioPhone Next फक्त २१६ रुपयात घेऊन जा घरी

245 0

नवी दिल्ली : Reliance Jio ने सादर केलेला ioPhone Next घरी घेऊन जाण्यासाठी आता फक्त २१६ रुपये द्यावे लागणार आहेत. बाकी पैसे ईएमआय द्वारे भरू शकता. हा फोन तुम्ही ५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. काय आहेत JioPhone Next स्मार्टफोनवरील ऑफर्स

Reliance Jio ने गेल्यावर्षी JioPhone Next ला लाँच केले होते. मात्र या फोनची किंमत समोर आल्यानंतर यूजर्सची निराशा झाली होती. Jio ने फोनला खरेदीसाठी वेगवेगळे ईएमआय पर्याय दिले होते. मात्र, ईएमआयवर खरेदी केल्यावर फोनची किंमत १४ हजार रुपयांच्या पुढे जाते.

JioPhone Next सध्या ई-कॉमर्स साइट Amazon India वर फक्त ४५९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. या फोनला कंपनीने ६,४९९ रुपये किंमतीत लाँच केले होते. एक्सचेंज ऑफर अंतर्गत ग्राहक या फोनला फक्त ४,४९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकतात. यासाठी यूजर्सला जूना फोन देऊन एक्सचेंज ऑफरचा लाभ घ्यावा लागेल. मात्र, ही ऑफर तुमच्या जुन्या फोनच्या लेटेस्ट मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. फोनला खरेदी करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. कारण आता फोन ५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे.

JioPhone Next चे फीचर्स

लक्षात घ्या की JioPhone Next कॅरियर-लॉकसह येतो. याचा अर्थ फोनमध्ये तुम्ही दुसऱ्या कंपनीचे सिम कार्ड वापरू शकत नाही. यात केवळ जिओचे सिम कार्ड काम करेल. JioPhone नेक्स्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन २१५ SoC सह येतो. यात २ जीबीपर्यंत रॅम आणि ३२ जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळेल. हा फोन Pragati OS वर काम करतो. या ओएसला खासकरून भारतीय यूजर्ससाठी डिझाइन करण्यात आले आहे. यामध्ये पॉवर बॅकअपसाठी ३५०० एमएएचची बॅटरी दिली आहे. तर सेल्फी व व्हिडिओ कॉलिंगसाठी १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

Share This News

Related Post

चारचाकी चालवताना नापास झालात तरी धीर सोडू नका…(व्हिडिओ)

Posted by - March 23, 2022 0
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला(आरटीओ) दोन स्टिम्युलेटर प्राप्त झाले असून त्याद्वारे रोज किमान 50 उमेदवारांना पंधरा मिनिटांचे चार चाकी चालविण्याचे प्रशिक्षण…

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमाकांत तांबोळी यांचे निधन

Posted by - May 6, 2022 0
पुणे – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी साहाय्यक समितीचे विश्वस्त, लोकप्रिय वसतिगृह पर्यवेक्षक रमाकांत तांबोळी (वय ८८) यांचे अल्पशा आजाराने…

पाय गमावलेल्या बिहारच्या त्या जिद्दी मुलीला सोनू सूद मदत करणार

Posted by - May 26, 2022 0
मुंबई- अभिनेता सोनू सूद याने कोरोनाच्या काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांसाठी मदतीचा हात पोहोचवला. सोनू सूद नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत…

पुणे महापालिकेचा ‘माझी वसुंधरा पुरस्कार’ देऊन गौरव

Posted by - June 7, 2022 0
मुंबई- यावर्षीचा माझी वसुंधरा पुरस्कार पुणे महापालिकेस प्रदान करण्यात आला. माझी वसुंधरा अभियान आणि महाराष्ट्र शासन अंतर्गत हा पुरस्कार देण्यात…

जागतिक नेत्रदान नेत्रदान दिनानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांनी केला नेत्रदानाचा संकल्प

Posted by - June 10, 2022 0
पुणे- जागतिक नेत्रदान नेत्रदान दिनाच्या पूर्वसंध्येला भोई प्रतिष्ठानच्या वतीने आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सफाई कर्मचारी बांधव आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *