आम्ही शिवसेना सोडलेली नाही, आजही आम्ही शिवसैनिकच !- दीपक केसरकर

360 0

मुंबई – आम्ही शिवसेना सोडलेली नाही. आम्ही आजही शिवसेनेत आहोत. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिकच आहोत. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो असे म्हणणे चुकीचे आहे. मात्र आम्ही शिवसेना सोडल्याच भासवलं जात आहे. फक्त विधानसभेमध्ये आमच्या गटाला काय नाव असावे याची चर्चा सुरु आहे. अशी माहिती शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली आहे. शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांची आज गुवाहाटीमधील हॉटेलात बैठक झाली. या बैठकीनंतर दीपक केसरकर यांनी माध्यमांशी ऑनलाईन संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

दीपक केसरकर म्हणाले, ” उद्धव ठाकरे यांनी आम्ही या अगोदरही सांगितले होते. आम्हाला महाविकास आघाडीबरोबर जायचं नाही. आम्ही कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेतला नाही. आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला जातोय. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन जात आहोत. आम्ही शिवसेनेचेच सदस्य आहोत. एकनाथ शिंदे हे आमच्या गटाचे नेते आहेत. आम्ही शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेलो आहोत. आमच्याकडे दोन तृतीयांश सदस्य आहेत”

शिवसेनेकडे ५५ आमदार होते. आता आमची संख्या ५० च्या वर झाली आहे. त्यामुळे १६ आमदार ज्यांच्याकडे आहे त्यांनी एवढी मोठी संख्या असलेल्या नेत्याला गटनेतेपदावरून हटवू शकत नाही. शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवण्याचा निर्णय चुकीचा असून त्या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत असे केसरकर म्हणाले.

महाराष्ट्रात सध्या जे दाखवले जाते त्यापेक्षा परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी रस्त्यावर येण्याची गरज नाही. कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन दीपक केसरकर यांनी केले आहे. तसेच परिस्थिती नीट झाल्यावर आम्ही मुंबईत येऊ असे देखील ते या वेळी म्हणाले.

आमच्या पक्षाचे नाव शिवसेनाच

एकनाथ शिंदे यांनी सत्तासंघर्षात एक पाऊल पुढं टाकलं आहे. आपल्या गटाचं नाव आता त्यांनी ठेवलं असून ‘शिवसेना-बाळासाहेब ठाकरे’ असं शिंदे गटाचं नाव ठरल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र आमच्या पक्षाचे नाव शिवसेनाच आहे. आम्ही शिवसैनिक म्हणून काम करणार आहे, असे म्हणत गटाचं नाव ठरल्याच्या चर्चांवर पडदा टाकला आहे.

Share This News

Related Post

लाखोंची नोकरी सोडून सुरू केली सामोसा विक्री; आता कमवतात तब्बल इतके कोटी रुपये?

Posted by - March 18, 2023 0
आपण अनेकांना मोठमोठ्या पॅकेजेसची नोकरी करताना किंवा शोधताना बघत असतो पण तुम्ही कधी कोणाला लाखो रुपयांच्या पॅकेजची नौकरी सोडून समोसे…

NET, SET, PHD धारक संघर्ष समितीचे प्राध्यापक भरतीसाठीचे आंदोलन; बुद्धिवंतांची मुस्कटदाबी करू नका; आंदोलनकर्त्यांचा निर्वाणीचा इशारा…

Posted by - October 27, 2022 0
पुणे : गेल्या कित्येक वर्षापासून राज्यभरातील वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकांची भरती बंद असून त्यामुळे नेट सेट पीएचडी या उच्च पदव्या…
Amit Thackeray

Amit Thackeray : मनसेमध्ये मोठा राडा ! अमित ठाकरेंवर पदाधिकाऱ्याने केला मारहाणीचा आरोप

Posted by - January 9, 2024 0
नवी मुंबई : नवी मुंबईतील कामोठे इथं मनसेचे मराठी कामगार सेना राज्य उपाध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं…

विधानपरिषद निवडणुकीचा पूर्ण निकाल ; वाचा सविस्तर कुणाला किती मतं मिळाली?

Posted by - June 20, 2022 0
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल अखेर लागला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे…

सरदार पटेलांच्या निजामावरील पोलिस ॲक्शनप्रमाणेच प्रधानमंत्री, गृहमंत्र्यांची कश्मीरमधून ३७० कलम हटविण्याची हिम्मत

Posted by - September 18, 2022 0
मुंबई: कश्मीर मधून 370 कलम हटविण्याची हिंमत प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांनी दाखविली आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. हैदराबाद मुक्ती संग्रामानिमित्त…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *