महत्वाची बातमी ! अनिल देशमुख, नवाब मलिकांना विधानपरिषदेसाठी मतदान करता येणार नाही, उच्च न्यायालयाचा निर्णय

360 0

पुणे- माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही असा महत्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

येत्या २० जून रोजी विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी काही तास विधानभवनात जाऊ देण्याची परवानगी मागितली होती. मात्र न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळली आहे.

यापूर्वी देखील राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी मुंबई सत्र न्यायालयाने नाकारली होती. त्यामुळे महाविकास आघाडीची दोन मते कमी झाली होती.

विधान परिषद निवडणुकीमध्ये आमदारांचे संख्याबळ पाहता भाजप आणि काँग्रेसमध्ये आमदार निवडून आणण्याची लढत पाहायला मिळत आहे. भाजपला पाचवा उमेदवार निवडून आणण्याकरिता 22 मतांची आवश्यकता आहे तर काँग्रेसला 10 मताची आवश्यकता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार त्यांच्याकडे असलेल्या उपलब्ध आमदारांच्या संख्येनुसार सहज निवडून येणार आहेत.

राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकासआघाडीचा झालेला पराभव पाहता महाविकास आघाडीकडून सावध पवित्रा घेण्यात आला असून भाजपचा उमेदवार टाळण्याकरिता रणनिती आखण्यात आली आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये उमेदवार विजयी होण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी दोघांनाही अपक्ष आमदारांची मदत लागणार आहे. त्यामुळे आता घोडेबाजार होणार हे स्पष्ट आहे.

विधानसभेत 13 अपक्ष आमदार तर छोट्या पक्षांचे 16 आमदार आहेत. राष्ट्रवादीचे 53 आमदार असून माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. विधानसभेत शिवसेनेचे 56 आमदार होते. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे दुबईत नुकतेच निधन झाल्याने शिवसेनेच्या आमदारांची संख्या 54 वर आली आहे.विधानसभेत काँग्रेसचे 44 आमदार आहेत.

Share This News

Related Post

महाशिवरात्री 2023 : महाशिवरात्रीला ग्रहांच्या संयोगाने तयार होत आहे त्रिग्रह योग, ‘या’ 4 राशींचे भाग्य उजळणार ! कुंभ राशीच्या जातकाची इच्छा पूर्ण होईल

Posted by - February 14, 2023 0
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीच्या लोकांच्या आयुष्यावर ग्रहांच्या राशीबदल आणि संयोगाचा शुभ किंवा अशुभ प्रभाव पडतो. त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात कुंभ राशीत तीन…

ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाची सुरेल सुरुवात

Posted by - June 5, 2022 0
प्रतिथयश युवा कलाकारांनी सादर केलेल्या ‘देवा घरचे ज्ञात कुणाला’, ‘विलोपले मधुमिलनात या’, ‘गुंतता हृदय हे’, ‘ऋतुराज आज वनी आला’, ‘धीर…

समृध्दी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; 14 जणांचा मृत्यू

Posted by - August 1, 2023 0
समृद्धी महामार्गावर अपघात झाला असून १४ कामगारांचा यात मृत्यू झाला आहे. शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू असताना पुलावरील…

VIDEO : मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खा. श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा फोटो व्हायरल… पाहा

Posted by - September 23, 2022 0
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचा फोटो सध्या व्हायरल होतोय. त्यामुळं खुर्ची…
Raigad Sohala

राज्याभिषेक सोहळ्यातुन ‘हा’ नेता तडकाफडकी रायगडावरून निघून गेला; चर्चाना उधाण

Posted by - June 2, 2023 0
पुणे : रायगडावर मोठ्या दिमाखात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा (350th coronation ceremony of Chhatrapati Shivaji Maharaj)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *