पुण्यात विद्युत मोटार कंपनीला आग ; अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांनी आग आटोक्यात

456 0

पुणे- पुणे महापालिकेजवळ असलेल्या विद्युत मोटार कंपनीच्या तळमजल्यावरील 3 हजार स्क्वेअर फूटच्या रेकॉर्ड रूमला आज बुधवारी सकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये रेकॉर्ड रूममधील ७० टक्के कागदपत्रे जळून खाक झाली. सुदैवाने या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

घटनेबाबत पुणे अग्निशमन दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर यांनी सांगितले की, मंगला टॉकीज शेजारील परिसरात चार मजली व्यवसायिक इमारत आहे. इमारतीच्या तळमजल्यावर विद्युत मोटार कंपनीचे रेकॉर्ड रूम आहे. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात कागदपत्रे होते.

इमारतीच्या तळमजल्यावर आग लागल्याची माहिती मिळताच सुरुवातीला कसबा अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. मात्र मोठ्या प्रमाणात आग आणि धूर असल्याने अग्निशमन दलाच्या आणखी चार गाड्या घटनास्थळी मागून घेण्यात आल्या. गाड्यांनी सर्व बाजूंनी पाण्याचा फवारा मारत सदर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

अग्निशमन दलाचे कर्मचारी राजू शेलार, राजाराम केदारी, मंगेश मिळवणे, सुनील टेंगळे, प्रताप फणसे यांच्या पथकाने आग आटोक्यात आणली.

Share This News

Related Post

राज्यात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात आहे – शरद पवार

Posted by - November 5, 2022 0
शिर्डी : तुम्ही राज्यभरातून मोठ्या संख्येनं आला आहात. शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही सर्वांचं म्हणणं ऐकून घेत आहात. राज्यात परिवर्तन घडवून आणण्याची…
Shakuni Mama

महाभारतातील शकुनी मामा म्हणजेच गूफी पेंटल यांचे निधन

Posted by - June 5, 2023 0
मुंबई : काल रात्री ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांचे निधन झाल्याची बातमी ताजी असताना पुन्हा एकदा मनोरंजन सृष्टीतून…

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक आम्ही जिंकूच ! – चंद्रशेखर बावनकुळे

Posted by - October 14, 2022 0
मुंबई : अंधेरी पूर्व पोट निवडणुकीत शिंदे गट आणि ठाकरे गट पहिल्यांदाच भिडणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक आता दोन्हीही गटांसाठी…

#GOA : कुठे रंग आणि गुलाल, कुठे फुले पण गोव्यातील या अग्नी होळी विषयी ऐकलंय का ? नक्की वाचा हि आश्चर्यकारक माहिती

Posted by - March 8, 2023 0
होळी हा रंगांचा सण असला तरी भारतातील वैविध्यपूर्ण देशात होळी ही अनेक प्रकारे साजरी केली जाते. कुठे रंग आणि गुलाल,…

अक्कलकोट भक्तनिवासासाठी बुकिंग करताना सावधान ! होऊ शकते फसवणूक

Posted by - April 26, 2023 0
अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज ट्रस्टच्या भक्त निवासामध्ये खोली बुक करून देण्याच्या बहाण्याने एका महिलेला तीन लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *