एकनाथ खडसे यांचे पुनर्वसन ! राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर

391 0

मुंबई- विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर याना संधी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत घोषणा केली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शिवाजी गर्जे तिसरा डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असल्याचे समोर आले आहे.

विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 20 जूनला निवडणूक होणार आहे. या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यात खूप महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. एकनाथ खडसेंना विधानपरिषदेवर संधी देण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती मात्र, त्याच दरम्यान नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचंही बोललं जाऊ लागलं. त्यामुळे खडसेंना संधी मिळणार की नाही याबाबत विविध चर्चा सुरू होत्या. पण अखेर आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

एकनाथ खडसे यांचे नाव विधान परिषदेसाठी घोषित झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी खडसेंच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी केली. जळगाव जिल्ह्यातून कार्यकर्ते खडसेंच्या निवासस्थानी दाखल होत आहेत. आपल्याला उमेदवारी दिल्याबद्दल पक्षाचा आभारी असून शरद पवार यांचा विश्वास मी सार्थ करुन दाखवेन अशी भावना खडसे यांनी व्यक्त केली. भाजपनं अडगळीत टाकल्यानंतर राष्ट्रवादीनं हात दिला, असंही खडसे म्हणाले.

अनिल देशमुख, नवाब मलिक यांना मतदानाची संधी मिळेल का ?

राष्ट्रवादीच्या जेलमध्ये असलेल्या सदस्यांच्या दोन मतांचं काय होणार याचा फैसला आज न्यायालयात होणार आहे. माजी मंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनी मतदानासाठी जामीन मिळावा म्हणून अर्ज केलाय. त्याला ईडीनं विरोध केलाय. कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही असा दावा ईडीनं कोर्टात केलाय. त्याला देशमुख आणि मलिकांचे वकील आज उत्तर देणार असून न्यायालयात त्यावर आज निर्णय अपेक्षित आहे.

निवडणुकीच्या रिंगणात पक्षनिहाय उमेदवार

शिवसेना

सचिन अहिर
आमश्या पाडवी

काँग्रेस

भाई जगताप
चंद्रकांत हंडोरे

भाजप

प्रवीण दरेकर
उमा खापरे
श्रीकांत भारतीय
राम शिंदे
प्रसाद लाड (पाचवे उमेदवार)
सदाभाऊ खोत (सहावे उमेदवार)

राष्ट्रवादी

एकनाथ खडसे
रामराजे नाईक निंबाळकर

Share This News

Related Post

Santosa Hotel

पिंपरी चिंचवडमध्ये वॉटर पार्क मध्ये बुडून 6 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 15, 2023 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील रावेत पोलिस स्टेशन (Rawet Police Station) हद्दीतील नामांकित सेंटोसा हॉटेल मध्ये असलेल्या…

Jagdish Mulik : वाहतूक पोलिसांची अतिरिक्त कुमक उपलब्ध करून देणार; पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे आश्वासन

Posted by - October 19, 2022 0
पुणे : शहरातील वाहतुकीची कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक पोलिसांची अतिरिक्त कुमक तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता…

कोण राज्यपाल? मला त्यांचं नाव घ्यायचं नाही! निर्धार शिवसन्मानाचा कार्यक्रम रायगडावर सुरू

Posted by - December 3, 2022 0
रायगड : खासदार उदयनराजे भोसले यांचा निर्धार शिवसन्मानाचा कार्यक्रम रायगडावर सुरू आहे. यावेळी शिवप्रेमींशी बोलत असताना त्यांनी भाजप आणि राज्यपाल…
Dhairyasheel Mohite Patil

Madha Loksabha : अखेर माढ्याचा तिढा सुटला! धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटाचे उमेदवार

Posted by - April 11, 2024 0
माढा : माढा लोकसभा (Madha Loksabha) मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे प्रचंड नाराज झालेले मोहिते-पाटील यांनी…

कोकण रेल्वेचं 100% विद्युतीकरण पूर्ण ; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कौतुक

Posted by - March 30, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन 100% विद्युतीकरण’ च्या उल्लेखनीय यशाबद्दल आणि शाश्वत विकासाचे नवे मापदंड स्थापित केल्याबद्दल कोकण रेल्वेचं अभिनंदन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *