जिओच्या ७९९ रुपयांच्या एकाच पोस्टपेड प्लॅनमध्ये तीन जणांना फायदा, काय आहे हा प्लॅन ?

147 0

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Reliance Jio कडे प्रीपेड प्लान्ससोबतच कमी किंमतीत येणारे शानदार पोस्टपेड प्लान्स उपलब्ध आहेत. जिओकडे ७९९ रुपयांचा प्लान (Reliance Jio Family Postpaid Plan) देखील आहे. यामध्ये नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ सारख्या ओटीटी अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. तसेच, एकाच प्लानमध्ये तीन जणांना फायदा होईल. जिओच्या ७९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लानविषयी सविस्तर जाणून घेऊया.

७९९ रुपयांचा Jio Family Plan

Reliance Jio कडे ७९९ रुपये किंमतीचा शानदार पोस्टपेड फॅमिली प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये कंपनी एका प्रायमरी सिम कार्डसह २ अतिरिक्त सिम कार्ड देत आहे. या प्लानची वैधता एक महिना आहे. जिओच्या या पोस्टपेड प्लानमध्ये एकूण १५० जीबी हाय-स्पीड डेटा दिला जातो. प्लानमध्ये मिळणारा डेटा समाप्त झाल्यानंतर ग्राहकांना प्रती १ जीबीसाठी १० रुपये द्यावे लागतील. यात २०० जीबी डेटा रोलओव्हरची सुविधा देखील मिळते. प्लानमध्ये देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसचा फायदा मिळतो.

जिओच्या या प्लानमध्ये अतिरिक्त बेनिफिट्सचा देखील फायदा मिळतो. यामध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. याशिवाय, JioTV, JioSecurity आणि JioCloud चा मोफत अॅक्सेस मिळेल. यात प्राइम व्हिडिओचे १ वर्षासाठी सबस्क्रिप्शन मिळते. तसेच, JioPrime साठी ९९ रुपये खर्च करावे लागतील. दरम्यान, कंपनीकडे ५९९ रुपयांचा पोस्टपेड फॅमिली प्लान देखील उपलब्ध आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, १०० जीबी हाय-स्पीड डेटा, नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि प्राइम व्हिडिओचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. या प्लानमध्ये देखील एक अतिरिक्त सिम कार्डसह एकूण दोन सिम कार्ड दिले जातात.

Share This News

Related Post

Dr joshi

DRDO च्या संचालकपदी डॉ. मकरंद जोशी यांची नियुक्ती

Posted by - June 1, 2023 0
पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या डीआरडीओ (DRDO) दिघे येथील संशोधन आणि विकास आस्थापना (अभियंता) या प्रयोगशाळेच्या संचालक पदी…

मनोरंजन क्षेत्रावर शोककळा; अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

Posted by - August 9, 2022 0
मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे तीन दशकांहून अधिक काळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले…

पुणेकरांसाठी खुशखबर! पुणे मेट्रो स्थानकांवर प्रवाशांसाठी पाच नवीन प्रवेश आणि गंतव्य द्वारे खुली

Posted by - June 16, 2024 0
  पुणे, 15 जून 2024: मेट्रो प्रवाशांसाठी सुविधा आणि प्रवेश क्षमता सुधारण्यासाठी, पुणे मेट्रोने पीएमसी मेट्रो स्टेशन, छत्रपती संभाजी उद्यान…

भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे ; मुंबईच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती

Posted by - August 12, 2022 0
मुंबई : अखेर अनेक नावांच्या स्पर्धेमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.  चंद्रकांत पाटील यांचा शिंदे…

ई-मान्यता प्रणाली राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल-शिक्षणमंत्री दिपक केसरकर

Posted by - April 2, 2023 0
पुणे जिल्हा परिषदेने सुरू केलेली ई-मान्यता प्रणाली राज्यस्तरावरील एकात्मिक शाळा व्यवस्थापन प्रणाली सुरू करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. अशी प्रणाली विकसीत करताना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *