पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रोच्या दोन्ही भुयारी बोगद्यांचे काम पूर्ण

271 0

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या स्वारगेट ते बुधवार पेठ या भूमिगत मार्गावर बोगदा खोदकामाचे शेवटच्या टप्प्यातील काम शनिवारी पूर्ण झाले.

भूमिगत मार्गासाठी स्वारगेट येथून दि. 2 सप्टेंबर 2021 रोजी खोदकाम सुरू झाले होते. टीबीएम मुळा-2 मशीनद्वारे स्वारगेट ते बुधवार पेठ 2.75 कि.मी. बोगदा तयार करण्यासाठी अंदाजे 10 महिन्यांचा कालावधी लागला. बुधवार पेठ मेट्रो स्थानकातील “ब्रेक थ्रू’ चे अंतिम टप्यातील काम पूर्ण झाल्यामुळे मेट्रोच्या एकूण 12 कि.मी. लांबीच्या भूमिगत बोगद्याचे काम आता 100 टक्‍के पूर्ण झाले आहे.

पुणे मेट्रो प्रकल्पाचा भुयारी भाग हा अत्यंत आव्हानात्मक आणि महत्त्वाचा भाग आहे. तांत्रिक कौशल्य आणि ठोस प्रकल्प व्यवस्थापनामुळे बोगद्याचे काम कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण झाले आहे. बोगद्याचे काम पूर्ण झाल्यामुळे ट्रॅक, सिग्नलिंग आणि ट्रॅक्शनच्या कामासाठी मार्ग मोकळा झाला आहे.

Share This News

Related Post

…..’या’ कारणासाठी रवी राणा यांनी घेतला मातोश्रीवर न जाण्याचा निर्णय

Posted by - April 23, 2022 0
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी आंदोलन घेत असल्याचं पत्रकार…

लोकसभेतील पराभवानंतर महाराष्ट्र भाजपात फेरबदल होणार? आशिष शेलार चंद्रशेखर बावनकुळे तातडीनं दिल्लीला रवाना

Posted by - June 7, 2024 0
नवी दिल्ली: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्वबळावर 240 तर एनडीए आघाडीला 294 जागांवर यश मिळवता आलं असून आता…
Ajit Pawar

काम केले नाहीतर तर कानाखाली देईन; अजित पवारांनी कार्यकर्त्यांना झापलं

Posted by - June 5, 2023 0
पुणे : आज अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीला हजेरी लावली. यावेळी त्यांनी भरसभेत संवाद साधत असताना कार्यकर्त्यांना झापलं आहे. यावेळी…

पत्राचाळ घोटाळा प्रकरण : ईडीने दाखल केलेल्या आरोप पत्रामध्ये शरद पवारांचेही नाव ? वाचा सविस्तर

Posted by - September 20, 2022 0
मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणामध्ये संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये 4 ऑक्टोबर पर्यंत वाढ झाली आहे. दाखल केलेल्या आरोप पत्रामध्ये एक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *