Sant Tukaram

तुकोबांच्या पालखीचा पहिला मुक्काम आकुर्डीलाच का असतो? जाणून घ्या यामागची रंजक कथा

479 0

येत्या 10 तारखेला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या मुक्कामाचं पहिलं स्थान आहे आकुर्डीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिर. त्यामुळे चारशे वर्षांपूर्वीच्या या मंदिराला समृध्द अशी परंपरा आहे. तर आज आपण या मंदिराचे महत्व आणि त्याची आख्यायिका जाणून घेणार आहोत.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या परंपरेनुसार आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात पालखीचा पहिला विसावा असतो. आकुर्डीतील हे मंदिर परंपरेने कुटे कुटुंबाकडे आले आहे. वारी दरम्यान संत तुकाराम महाराज या ठिकाणी मुक्काम करत. त्यामुळे तुकोबारायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मंदिराला विशेष महत्त्व आहे. मंदिराच्या ठिकाणी पूर्वी शेती होती. मंदिराच्या चारही बाजूने घडीव दगडांची भिंत आहे. मंदिराचे जुने लाकडी प्रवेशद्वार आजही सुस्थितीत आहे. जुन्या काळात पाषाणात घडवलेली विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रसन्न मूर्ती दगडी महिरपीत आहेत. या प्राचीन मंदिरांच्या बाबतीत एक आख्यायिकाही प्रचलित आहे. तर ही आख्यायिका काय आहे चला पाहूया…

एकदा श्री संत तुकाराम महाराज पंढरीच्या वारीसाठी देहूगावातून निघाले होते. यादरम्यान आकुर्डी गावाजवळ येताच त्यांच्या पोटात दुखू लागले. असह्य वेदनांनी ते हतबल झाले. यावेळी घरगुती उपचारांनंतरही त्यांच्या वेदना थांबल्या नाहीत. त्यामुळे यंदा वारी चुकते की काय असा विचार त्यांच्या मनात डोकावू लागला. तेवढ्यात त्या ठिकाणी साक्षात विठ्ठल रुक्मिणी अवतरले. त्यानंतर तुकाराम महाराजांची पोटदुखी कमी झाली. त्याच ठिकाणी आजचे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर बांधण्यात आले, अशी आख्यायिका आहे. यामुळे पालखीच्या मुक्कामाचा पहिला मान आकुर्डीला मिळतो. या पालखी सोहळ्यासाठी पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेकडून मंदिर आणि परिसराची स्वच्छता तसेच पाण्याची व्यवस्था केली जाते.

Share This News

Related Post

Tushar Doshi

IPS Tushar Doshi : जालना एसपी तुषार दोषींची पुन्हा बदली; ‘या’ ठिकाणी केली पोस्टिंग

Posted by - November 25, 2023 0
मुंबई : आयपीएस अधिकारी तुषार दोशींची (IPS Tushar Doshi) पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. पुणे सीआयडीमधून त्यांना आता पुणे…
Sunetra Pawar

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्या नावावर किती आहे संपत्ती?

Posted by - June 13, 2024 0
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची राज्यसभेवर निवड झाली आहे. यावेळी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज…
Kondwa Police Station

पुणे हादरलं! संशयावरून पतीचे पत्नीसोबत धक्कादायक कृत्य; पत्नीला बेडरुममधील पलंगाला बांधले आणि….

Posted by - May 4, 2023 0
पुणे : मागच्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका आरोपी नराधम पतीने आपल्या…

पुढील 72 तास राज्यासाठी धोक्याचे !

Posted by - May 12, 2023 0
मुंबई: राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या विभागातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात…
Wari Video

Wari Video : वारीत हरिनामाच्या गजरात महाराष्ट्र पोलीसही तल्लीन

Posted by - June 20, 2023 0
पुणे : सबंध महाराष्ट्र सध्या विठूरायाच्या भक्तीत तल्लीनं (Wari Video) झाला आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण, खान्देश अशा सर्व भागांमधून विविध…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *