Trikonasana

Trikonasana : त्रिकोणासन करण्याचे काय आहेत अद्भुत फायदे ?

219 0

त्रिकोनासन (Trikonasana) ज्याला त्रिकोणी मुद्रा किंवा त्रिभुज मुद्रा असेही म्हणतात, हे प्राचीन इतिहास असलेले उभे योग आसन आहे. त्रिकोनासनाचा उगम प्राचीन भारतात झाला असे म्हटले जाते आणि पौराणिक ऋषी पतंजली यांनी ते शिकवले होते.

त्रिकोणासान  करत असताना आपल्या शरीराचा आकार गणितातील त्रिकोणासारखा होतो म्हणून या आसनाला त्रिकोणासान म्हंटले जाते. त्रिकोणासान ही मुद्रा शरीराला एकाच वेळी तीन वेगवेगळ्या कोणात आणून ठेवते आणि संपूर्ण शरीराचे सामान्य कार्य चांगले ठेवयास मदत करते.

बसून काम केल्याने अति वजन आणि कमरेसंबंधीत अनेक समस्यांचा सामना आजकाल करावा लागतो आहे. बैठे कामामुळे पचणाबंधीत  अनेक समस्या सतावत असतात. त्रिकोणासनामुळे आपण ह्या सर्व समस्यांवर मात करू शकतो.

त्रिकोणासान करण्याची पद्धत

• प्रथम योगा मॅटवर सावधान स्थितीत उभे राहावे.

• दोन्ही पायामध्ये तीन ते चार फुट एवढे अंतर असावे,किवा जेवढा पायाला ताण देता येईल तेवढे अंतर ठेवावे.

• उजवे पाऊल 90 अंशामध्ये उजवीकडे वळवावा.

• हे करत असताना उजव्या पायाची टाच आणि डाव्या पावलाचा कमानी भाग एका रेषेत असावा याकडे लक्ष द्या.

• शरीराचे वजन दोन्ही पायांवर समान असेल याकडे लक्ष असावे.

• दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ जमिनीला समांतर ठेवत सावकाश उजवा हात उजव्या बाजूला जमिनीकडे तर डावा हात आकाशाच्या दिशेला खांद्याच्या रेषेत सरळ ठेवावा.

• शरीर समोरच्या दिशेला न झुकता कमरेत उजव्या बाजूस शक्य तितके वाकवून, उजव्या हाथ उजव्या पायाच्या घोट्यावर किवा उजव्या पावलाच्या मागच्या बाजूस ठेवावे.

• डावा हाथ आकाशाच्या दिशेने सरळ ठेवत छातीच्या दिशेने तणावा आणि नजर वरती डाव्या हाताच्या तळव्यावर असावी.

• नजर स्थिर असावी. दोन्ही गुडघे ताठ असावे,आणि लक्ष केंद्रित असावे.

• श्वासोच्छवास संथ ठेवून लक्ष श्वासावर केंद्रित ठेवावे.

• नंतर दीर्घ श्वास घेऊन शरीर सावकाश उजव्या बाजूने वरती घ्यावे. आणि परत पूर्वस्थितीत यावे.

• नंतर डावा पाय 90 अंशात डावीकडे वळवावा आणि वरील कृती परत करा.

त्रिकोणासनाचे फायदे
त्रिकोनासन, एक अद्भुत योगासन आहे ज्याचे असंख्य शारीरिक आणि मानसिक आरोग्य फायदे आहेत. शरीरात ताकद आणि लवचिकता वाढवण्याचा हा पोझ एक उत्तम मार्ग आहे, तसेच ऊर्जा पातळी वाढवतो. त्रिकोनासन केवळ शारीरिक आरोग्यासाठीच मदत करत नाही, तर मानसिक आरोग्यासाठीही ते आश्चर्यकारकपणे फायदेशीर ठरू शकते.

1) बसून कामामुळे पोट ,ओटीपोट आणि मांड्या ही चरबी कमी करण्यास मदत होते .

2) छाती ,गुडघे,हाथ ,पाय आणि घोटे यांमध्ये बळकटी येते.

3) मांड्या , सांधे ,स्नायू ,पाठीचा कणा आणि माकड हाड लवचिक होतात.

4) त्रिकोणसनाचा अभ्यास नियमित केल्यास वतामुळे होणारे त्रास कमी होण्यास मदत होते व कालांतराने ते उद्भवतच नाहीत.

5) अकारण भीती अशा समस्यांपासून सुटका होते.त्यामुळे शारीरिक आणि मानसिक संतुलन टिकून ठेवण्यास मदत होते.

6) त्रिकोनासन हृदयविकार, उच्च रक्तदाब, श्वासोच्छवासाच्या समस्या आणि डोकेदुखी यासह अनेक वेगवेगळ्या परिस्थितींसाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जाते.

7) हे संतुलन आणि एकाग्रता सुधारण्यासाठी देखील म्हटले जाते.

त्रिकोणासान करताना घ्यायची काळजी

• मानदुखी ,पाठदुखी आणि जुलाब असणाऱ्यांनी हे आसन करू नये .

• कमी रक्तदाब ,सायटिका असणाऱ्यांनीसुद्धा हे आसन करणे टाळावे किवा प्रशिक्षकाच्या सल्ल्याने करावे.

• उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी हे आसन हाथ वर नेऊन ताण न देता खाली ठेवून केले तरी चालेल.

श्वास घेण्याची पद्धत

• आसन करताना श्वासोच्छवास नॉर्मल असावा.

• पूर्वस्थितीत येताना दीर्घ श्वास घेऊन शरीर परत पूर्वस्थितीत आणावे.

Share This News

Related Post

Sharad Pawar

Sharad Pawar : शरद पवारांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली ‘ही’ मोठी अपडेट

Posted by - November 12, 2023 0
पुणे : शनिवारी शरद पवार (Sharad Pawar) यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली होती. विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीमध्येच…
lemon leaves

Lemon Leaves : फक्त लिंबूचं नाहीतर त्याची पाने देखील असतात फायदेशीर

Posted by - August 18, 2023 0
लिंबाच्या पानांमध्ये (Lemon Leaves) अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ज्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. आपण दैनंदिन जीवनात जेवढा वापर लिंबूचा…
Eye Irritation

Eye Irritation : डोळे येण्याची कारणे कोणती आहेत? त्यांची काळजी कशी घ्यायची ?

Posted by - August 13, 2023 0
यंदाच्या पावसाळ्यात मुंबईमध्ये डोळे येण्याच्या (Eye Irritation) प्रमाणात वाढ झाली आहे. ह्यामध्ये डोळ्यातील (Eye Irritation) पांढऱ्या भागाला तसेच पापण्यांच्या अंतर्गत…
Sperm

Sperm : पुरुषांमधील स्पर्म काऊंट वाढण्यासाठी ‘या’ बिया ठरतात वरदान

Posted by - August 17, 2023 0
भोपळ्याच्या बिया शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. ह्या बियांचे फायदे ऐकल्यावर तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल. एका संशोधनामध्ये असे सिद्ध झाले आहे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *