Ustrasana

Ustrasana : उष्ट्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे ?

246 0

उष्ट्रासन (Ustrasana) करताना उंटाच्या शरीराचे अनुकरण करावे लागते. या आसनाला इंग्रजीमध्ये ‘कॅमल पोज’ असे म्हटले जाते. ज्याप्रमाणे वाळवंटासारख्या अवघड वातावरणामध्ये उंट आरामात राहू शकतात, अगदी त्याप्रमाणे या आसनाचा सराव केल्यास तुम्ही कोणत्याही परिस्थितीवर मात करु शकाल. या आसनामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक आजारांवर मात करता येते. निरोगी राहण्यासाठी या योग प्रकारांची मदत होते.

उष्ट्रासन करायची पद्धत

1. योगा मॅट जमिनीवर पसरवून त्यावर गुडघ्यांवर बसा.

2. दोन्ही हात नितंब किंवा कंबरेच्या मागच्या बाजूवर ठेवा.

3. तुमचे खांदे आणि गुडघे एका समांतर रेषेमध्ये असल्याची खात्री करुन घ्या.

4. पायाच्या तळव्यांचा वरचा भाग खाली आणि खालचा भाग वरच्या दिशेला असणे आवश्यक आहे.

5. श्वास आतमध्ये घेत पाठीच्या कण्यातील सर्वात खालचे हाड पुढच्या बाजूला येईल अशा प्रकारे पाठीवर दबाव टाका.

6. हे करताना पोटावर आणि बेंबीवर ताण आल्याचे तुमच्या लक्षात येईल.

7. पाठ मागच्या दिशेला नेताना हातांनी दोन्ही तळपाय पकडून ठेवायचा प्रयत्न करा.

8. मानेचा भाग मोकळा सोडा. मानेवर ताण पडणार नाही याची काळजी घ्या.

9. या आसनामध्ये 30-60 सेकंद स्थिर राहण्याचा प्रयत्न करा.

10. त्यानंतर श्वास सोडत आसनाच्या मुद्रेतून बाहेर या. पाठ-हात हळूवारपणे पुढे आणा आणि सर्वसाधारणपणे बसा.

उष्ट्रासनाच्या सरावामुळे होणारे फायदे

1. या आसनामुळे पचनक्रिया सुधारते. पाठ वाकवल्यामुळे पोटाच्या आतमधील अवयवांना मालिश झाल्याने ते उत्तेजित होतात.

2. उष्ट्रासनाचा सराव केल्यामुळे छाती आणि पोटाच्या खालच्या भागातील अतिरिक्त चरबी कमी होते. फॅट सेल्स बर्न होतात.

3. या आसनामुळे कंबर आणि खांद्यांचा भाग मजबूत बनतो.

4. उष्ट्रासनच्या अभ्यासामुळे कंबरेमध्ये होणार्‍या वेदनांचे प्रमाण कमी होते.

5. हे आसन नियमितपणे केल्यास पाठीच्या कण्यामधील लवचिकता वाढते. परिणामी हालचाल करताना त्रास होत नाही आणि बाॅडी पाॅश्चर सुधारण्यास मदत होते.

उष्ट्रासन करण्याआधी या गोष्टी जाणून घ्या
उष्ट्रासन करताना आपल्या पाठीचा कणा वाकतो, तोच भाग वाकवताना जास्त ताणू नका. इतर योगासनांप्रमाणे, या आसनाचा अभ्यास देखील सकाळी केला जातो. सकाळी व्यायाम करणे अधिक फायदेशीर असते. परंतु काही कारणांमुळे तुम्हांला सकाळच्या वेळी योगाभ्यास करायला वेळ न मिळाल्यास तुम्ही त्या दिवशी संध्याकाळी न केलेला सराव पूर्ण करु शकता. संध्याकाळी केलेल्या सरावामुळेही समान प्रमाणात फायदा होतो.

हे आसन करण्याआधी पोट साफ असणे आवश्यक असते. त्यामुळे उष्ट्रासन करण्यापूर्वी शौच करुन यायची सवय स्वतःला लावून घ्यावी. पोट खाली असताना उष्ट्रासन केल्यास जास्त फायदा होतो असे तज्ज्ञ सांगतात. जर तुम्ही सायंकाळी उष्ट्रासन करणार असाल, तर दुपारच्या जेवणानंतर कमीत कमी चार तास पूर्ण झाल्यावर मगच या आसनाचा सराव करा. पोट खाली असल्यामुळे फारसा त्रास होणार नाही.

Share This News

Related Post

Sex Life

Sex Life : या ‘3’ सवयी तुमच्या सेक्स लाईफसाठी ठरू शकतात घातक

Posted by - August 16, 2023 0
इंटीमेसी (Sex Life) अर्थात लैंगिक संबंधांमुळे जोडप्याच्या नात्यांमध्ये मजबूती येते. मात्र अश्या काही सवयी आहेत ज्यामुळे तुमच्या सेक्स लाईफवर (Sex…
Manohar Joshi

Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; हिंदुजा रुग्णालयात दाखल

Posted by - February 22, 2024 0
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांना पुन्हा एकदा हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकृती अस्वस्थामुळे…
Glaucoma

Glaucoma Symptoms : ‘या’ आजारामुळे वयाच्या आधी दृष्टी कमी होऊ शकते

Posted by - September 4, 2023 0
डोळ्यांची काळजी मौल्यवान आहे कारण त्यांच्याशिवाय जीवन खूप कठीण होते. अशा परिस्थितीत डोळ्यांशी संबंधित आजार (Glaucoma Symptoms) असल्यास सर्वप्रथम त्याची…
Thyroid Tips

Thyroid Tips : ‘या’ घरगुती उपायांनी करा थायरॉईडवर मात; त्रास होईल कमी

Posted by - September 7, 2023 0
चुकीची दिनचर्या, अचकळ-पचकळ खाणे आणि तणाव यामुळे शरीरात अनेक आजार घर करतात. यापैकी एक म्हणजे थायरॉईड (Thyroid Tips). या आजाराचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *