Setu Bandha Sarvangasana

Setu Bandha Sarvangasana : सेतुबंधासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

324 0

सेतू म्हणजे पूल. या आसनात शरीराचा (Setu Bandha Sarvangasana) आकार पुलासारखा दिसतो म्हणून या आसनास सेतुबंधासन असे म्हणतात. हे एक उपयुक्त आसन असल्यामुळे सर्व वयोगटातील स्री पुरुषांनी ते करण्याचा प्रयत्न करावा. या आसनाच्या नियमित सरावामुळे फुफ्फुसांना योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होऊन फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते व तसेच उच्च रक्तदाब, दमा, ऑस्टिओपोरोसिस, सायनस या सारखे आजार दूर करते. या आसनाचा सराव आपल्याला तणाव मुक्त करू शकते. जर तुमची नेहमीच चीड चीड होत असेल, तुम्हाला कुठल्या गोष्टीचा ताण येत असेल तर या आसनाच्या सरावामुळे तुमचे मन शांत होऊन तुमचा ताण कमी होण्यास मदत होते.

सेतुबंधासन कसे करावे ?
• जमिनीवर पाठीवर सरळ झोपा.
• आता गुडघे वाकवून कंबर आणि नितंबाचा भाग जमिनीपासून वर उचला.
• कंबरेला आकृतीत दाखवल्या प्रमाणे हातांचा आधार द्या.
• डोके, मान व  खांदे जमिनीवर टेकलेले असू द्या.
• सहजपणे श्वासोश्वास करत राहा.
• आठ ते दहा सेकंदापर्यंत आपण या आसन स्थितीत राहा.
• आता पूर्व स्तिथीत या व काही वेळ विश्रांती घ्या.
• विश्रांती नंतर पुन्हा वरील क्रिया करा.
• सुरुवातील चार वेळा हि क्रिया करा व काही दिवसांच्या सरावानंतर सहा वेळा हे आसन करा.
• हे आसन करताना घाईगरबड करू नका, हे आसन करता कमरेला झटका बसणार नाही याची काळजी घ्या.
• या आसनामुळे खांदे, मान, हाताचे कोपरे व हातांच्या पंज्यातील सांध्यांना भरपूर व्यायाम मिळतो.
• पाठीच्या कण्याला लवचिकपणा येतो आणि पाठीचा कणा सुदृढ व कार्यक्षम बनतो.
•  कंबर व नितंबामध्ये निर्माण होणाऱ्या विकृती दूर होतात.
• या आसनाच्या नियमित सरावामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.
• उच्च रक्तदाब, दमा, ऑस्टिओपोरोसिस, सायनस साठी हे आसन फार उपयोगी आहे.
• अस्थमा असलेल्या रुग्णांसाठी हे आसन फार उपयुक्त आहे.
• या आसनाचा नियमित सराव पाचन कार्यसुधारण्यास मदत होते तसेच वायू विकार आणि अजीर्णसारखा त्रास दूर होतो.
• या आसनाच्या सरावामुळे मन शांत होऊन आपला तणाव कमी होण्यास मदत होते. .

सेतू बंध सर्वांगासनाचा सराव करताना लक्षात ठेवण्याच्या काही खबरदारी
सेतू बंधसन ही एक लोकप्रिय योगासन आहे जी अभ्यासकाला अनेक फायदे देते. तथापि, कोणत्याही संभाव्य दुखापती किंवा ताण टाळण्यासाठी या आसनाचा सराव करताना काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.त्या खालीलप्रमाणे…

वॉर्म-अप: कोणत्याही योगासनांचा प्रयत्न करण्यापूर्वी आपले शरीर उबदार करणे महत्वाचे आहे. तुमचे स्नायू आणि सांधे तयार करण्यासाठी काही हलके स्ट्रेच आणि वॉर्म-अप व्यायाम करा.

ओव्हरस्ट्रेचिंग टाळा: पोझ करताना शरीर ओव्हरस्ट्रेच करू नका. आपल्या शरीराचे ऐका आणि आपल्या मर्यादेत रहा.

योग्य संरेखन: सेतू बंध सर्वांगासनाचा सराव करताना योग्य संरेखन महत्त्वपूर्ण आहे. आपले डोके, मान, खांदे आणि नितंब योग्यरित्या संरेखित असल्याची खात्री करा.

आपल्या मानेला आधार द्या: जर तुम्हाला मानेला दुखापत झाली असेल किंवा मान ताठ झाली असेल, तर पोझ दरम्यान तुमच्या मानेला आधार देण्यासाठी दुमडलेली ब्लँकेट किंवा उशी वापरण्याचा सल्ला दिला जातो.

गुडघा आणि पाठीच्या खालच्या दुखापती: गुडघ्याला किंवा पाठीच्या खालच्या भागाला दुखापत झालेल्या लोकांनी ही स्थिती टाळावी किंवा प्रयत्न करण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

गर्भधारणा: गर्भवती महिलांनी त्यांच्या नंतरच्या त्रैमासिकात सेतू बंध सर्वांगासनाचा सराव टाळावा किंवा योग्य योग शिक्षकाकडून मार्गदर्शन घ्यावे.

उच्च रक्तदाब: उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी हे आसन टाळावे किंवा एखाद्या योग्य योग शिक्षकाच्या देखरेखीखाली त्याचा सराव करावा.

टीप : सेतू बंध सर्वांगासन हे एक अत्यंत फायदेशीर योगासन आहे, परंतु कोणत्याही संभाव्य दुखापती किंवा ताण टाळण्यासाठी योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. तुम्हाला या पोझबद्दल काही चिंता किंवा प्रश्न असल्यास योग्य योग शिक्षकाचा सल्ला घ्या.

Share This News

Related Post

Summer Diet

Helath Tips : उन्हाळ्यात ‘या’ 10 पेयांचे करा सेवन; आरोग्य राहील उत्तम

Posted by - April 28, 2024 0
उन्हाळ्याच्या हंगामामध्ये आरोग्याबरोबरच आपल्या आहाराकडेही जास्त लक्ष द्यावे लागते. तीव्र सूर्यप्रकाश आणि घामामुळे लोकांना सुस्त आणि थकवा जाणवतो. या काळात…
Clove Side Effects

Clove Side Effects : ‘या’ लोकांनी उन्हाळ्यात चुकूनही करू नये लवंगाचे सेवन; होतील ‘हे’ दुष्परिणाम

Posted by - March 31, 2024 0
भारतीय स्वयंपाकघरात लवंगाचा (Clove Side Effects) वापर जेवणात सुगंध आणि चव आणण्यासाठी केला जातो. लवंगामध्ये असलेले व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के,…
Hemoglobin

Hemoglobin : हिमोग्लोबिन लेवल वाढवण्यासाठी खा ‘हे’ 5 सुपर फूड्स

Posted by - November 26, 2023 0
निरोगी राहण्यासाठी शरीरातील हिमोग्लोबिनची (Hemoglobin) पातळी संतुलित असणे अत्यंत आवश्यक आहे. शरीरात हिमोग्लोबिन कमी झाल्यास अशक्तपणा आणि रक्ताची कमतरता यासारख्या…
Health Tips

Health Tips : चुकूनही ‘ही’ पाच फळं खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका; नाहीतर भोगावे लागतील ‘हे’ परिणाम

Posted by - August 25, 2023 0
फळे खाण्याचे शरिराला असंख्य फायदे (Health Tips) आहेत. फळांत व्हिटॅमिन, मिनरल्स, फायबर, कॅल्शियम आयरन सारखे पोषक तत्वे असतात. हे सर्व…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *