Purvottanasana

Purvottanasana : पूर्वोतानासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

129 0

पूर्वोतानासन (Purvottanasana) हे नाव पूर्व व उत्तान अशा दोन शब्दांच्या संयोगाने तयार झालेले आहे. पूर्व म्हणजे पूर्वदिशा किंवा शरीराचा पुढचा भाग आणि उत्तान म्हणजे ताणलेला. हे आसन आपल्याला  तणावापासून दूर ठेवून आपले आरोग्य सुधारते. वर्तमान काळातील पोषण रहित जीवनशैलीमुळे शरीर कमजोर होऊ लागते व त्यामुळे श्वसनासंबंधी काही आजारांचा सामना करावा लागतो, यापासून सुरक्षित राहण्यासाठी पूर्वोतानासन हा एक प्रभावी पर्याय आहे.

पूर्वोतानासन करण्याची योग्य पद्धत
• समोरील दिशेने पाय सरळ करून बसा
• पाय एकमेकांशी जोडून,पाठीचा कणा  सरळ ठेवा
• तळहात जमिनीवर ठेवा, कमरेजवळ किंवा खांद्याजवळ, बोटांची टोके शरीरापासून दूर करून हात सरळ ठेवा
• मागे झुका आणि हातांनी शरीराच्या वजनाला आधार द्या.
• श्वास घेऊन श्रोणीचा भाग वर उचला, शरीर सरळ ठेवा.
• गुढघे सरळ ठेवून पाय व पायाची बोटे जमिनीवर ठेवा असे केल्याने तळपाय जमिनीवर टिकून राहतील व डोक्याच्या भागाला जमिनीच्या दिशेने मागे जाऊ द्यावे.
• या अवस्थेत श्वसन प्रक्रिया चालू ठेवा.
• श्वास सोडून परत या, बसून आराम करा.
• बोटांची दिशा बदलून आसनाची पुनरावृत्ती करावी.

पूर्वोतानासन करण्याचे फायदे
• हे मनगट, हात, खांदे, पाठ आणि पाठीचा कणा मजबूत ठेवते.
• पाय व नितंबाचा व्यायाम होतो.
• हे आसन श्वसन प्रक्रियेत सुधार करण्यास मदत करते.
• या आसनामुळे आतडे आणि पोटाच्या अवयवांमध्ये ताण निर्माण होतो.
• हे आसन थायरॉईड च्या ग्रंथींना उत्तेजित करते.

पूर्वोतानासन करतांना खालील खबरदारी घेतली पाहिजे
• मनगटात दुखापत झाली असेल तर पूर्वोतानासन काळजीपूर्वक करावे.
• मानेला दुखापत असल्यास पूर्वोतानासन करू नये.
• शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त जोर लावू नये.

Share This News

Related Post

Sonia Gandhi Health

Sonia Gandhi Health : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

Posted by - September 3, 2023 0
मुंबई : काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना (Sonia Gandhi Health) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ताप आल्यानं सोनिया…
Astavakrasana

Astavakrasana : अष्टवक्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Posted by - April 17, 2024 0
अष्टवक्रासन (Astavakrasana) म्हणजेच आठ कोन असणारे किंवा आठ जागेत शरीराला वाकवणारे आसन. हे आसन अष्टवक्र नावाच्या महर्षींना समर्पित आहे. अष्टावक्रासनाची…

काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे ‘या’ आजाराने आहेत त्रस्त

Posted by - October 20, 2022 0
नवी दिल्ली : 24 वर्षानंतर काँग्रेसला गांधी घराणे व्यतिरिक्त अध्यक्ष मिळाला आहे. मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यामध्ये झालेल्या लढतीनंतर…
Manohar Joshi

Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; हिंदुजा रुग्णालयात दाखल

Posted by - February 22, 2024 0
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांना पुन्हा एकदा हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकृती अस्वस्थामुळे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *