Kati Chakrasana

Kati Chakrasana : कटिचक्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

133 0

कंबरेचं दुखणं, स्लिप डिस्क आणि सायटिकाच्या दुखणं आपल्याला त्रास देतात. तर योगाचे एक असे आसन आहे ज्यामुळे आपल्याला आराम मिळू शकतो. या आसनामुळे विशेष करून फायदा होऊ शकतो. कंबर दुखण्यामुळे शरीरामध्ये आलेलं आखडलेपणा दूर होतो. जांघ, पार्श्वभाग, पाठीचा कणा आणि कंबर यात आलेला अवघडपणा दूर करून त्यांना मजबूत बनवतं. कंबरेची अतिरिक्त चरबी घालवून कंबरेचा आकार कमी करून ती आकर्षक बनवण्यास मदत होते. किडनी, यकृत, आतडी, स्वादुपिंड, मूत्राशय या सर्व गोष्टींवर दाब येतो, तसंच त्या खेचल्या जात असल्यानं त्यांचं कार्य सुरळीत चालण्यास मदत होते. बद्धकोष्ठता, गॅस, अपचन, लठ्ठपणा या विकारांमध्येही उपयुक्त आहे. आणि ते आसन म्हणजे लाभदायी ‘कटिचक्रासन’

कटिचक्रासनाची कृती
आपल्या आसनावर उभे राहा. दोन्ही पायात कमीत कमी एक फूट एवढे अंतर असू द्या.
आपले शरीर संपूर्ण सैल सोडा.
ज्या प्रमाणे आपण कवायत करताना दोनी हात समोर आणतो तसे दोन्ही हात सरळ समोर आना.
समोर आणलेल्या हातांचे तळवे एकमेकांकडे केलेले असावे. समोर आणलेले दोन्ही हात हे खांद्यांना समांतर असतील अशी काळजी घ्या.
दोन्ही हात छातीसमोर उचलताना खोल श्वास घ्या, आता हळू हळू उजवीकडे वळा.
वळताना हळूहळू श्वास बाहेर सोडा.
या स्थितीत उजव्या खांद्यावरून जेव्हडे मागे बघता येईल तेवढे बघण्याचा प्रयत्न करा.
आता पूर्व स्थितीत येताना हळू हळू श्वास घ्या.
आता हीच कृती डाव्या बाजूने करावी.
चार ते पाच वेळा हि कृती दोन्ही बाजूला करून झाल्या नंतर श्वास सोडत दोन्ही हात खाली आणावे.
हे आसन करताना कमरेच्या भागाला चांगला पीळ बसेल.

कटिचक्रासनाचे फायदे
या आसनाच्या सरावामुळे कमरेला  व पाठीच्या मणक्याला भरपूर व्यायाम मिळतो त्यामुळे त्यात लवचिकता येते व त्यांची कार्यक्षमता वाढते.
या आसनाच्या सरावामुळे पोटावरी चरबी कमी होण्यास मदत होते.
पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.
हाताच्या व पायांच्या स्नायूंना भरपूर व्यायाम मिळतो.
मान व खांद्याच्या स्नाययूंमधे येणारा ताण या आसनाच्या सरावाने कमी होतो.

Share This News

Related Post

Clove

Clove : पोटाची समस्या असेल तर लवंग ठरत आहे गुणकारी

Posted by - November 3, 2023 0
लवंग (Clove) हा सर्वसाधारण मसाल्याचा पदार्थ. हा पदार्थ जवळपास सर्वच जेवणात वापरला जातो. बिर्याणी किंवा कोणताही पदार्थ बनवताना तो स्वादिष्ट…
Tadasana

Tadasana : ताडासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Posted by - March 11, 2024 0
ताडासन करताना शरीराची स्थिती ताडीच्या झाडाप्रमाणे ताठ होते त्यामुळे या आसनाच ताडासन असे नाव आहे. ताडासन करण्याची पद्धत ताडासन हे…
Salabhasana-Yoga

Back Pain : सतत पाठदुखीचा त्रास जाणवतोय? तर घरीच सुरु करा ‘हे’ योगासन; लगेच मिळेल आराम

Posted by - September 10, 2023 0
धकाधकीच्या जीवनामुळे आणि सततच्या कामामुळे अनेकांना पाठदुखीचा (Back Pain) त्रास जडतो. अनेक उपाय केल्यानंतरही काही परिणाम दिसून येत नाही किंवा…
Sperm

Sperm : पुरुषांमधील स्पर्म काऊंट वाढण्यासाठी ‘या’ बिया ठरतात वरदान

Posted by - August 17, 2023 0
भोपळ्याच्या बिया शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. ह्या बियांचे फायदे ऐकल्यावर तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल. एका संशोधनामध्ये असे सिद्ध झाले आहे…
Diet

Diet : शरीर अ‍ॅक्टिव्ह आणि निरोगी ठेवण्यासाठी आहाराबाबतचे ‘हे’ नियम पाळा

Posted by - April 14, 2024 0
आपले शरीर अक्टिव्ह आणि निरोगी ठेवण्यासाठी हेल्दी आहार (Diet) आवश्यक असतो. पण फक्त खाद्यपदार्थ जेवणाला हेल्दी बनवत नाहीत. हेल्दी अन्नपदार्थ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *