Bhujangasana

Bhujangasana : भुजंगासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

417 0

सूर्य नमस्कारामध्ये एकूण बारा आसने असतात, त्यातील आठवे आसन म्हणजे भुजंगासन (Bhujangasana) होय. भुजंग म्हणजे साप/ नाग. त्यामुळे भुजंगासनाला ‘सर्पासन, कोबरा आसन किंवा सर्प मुद्रा’ असेही म्हटले जाते. या आसनामध्ये प्रथम पोटावर झोपून नंतर पाठ वर वाकवावी. त्यानंतर तोंड पुढे करुन हे आसन पूर्ण होते. तोंड पुढे केल्याने सापाच्या फणा काढण्याच्या कृतीची नक्कल होते. म्हणूनच ह्याला भुजंगासन हे नाव पडले.

भुजंगासन करण्यापूर्वी काही आवश्यक गोष्टी ज्या तुम्हांला माहिती असणे गरजेचे आहे
भुजंगासन उपाशीपोटी करायचे असते. जेवल्यानंतर किंवा जेवायच्या आधी मर्यादित वेळेनंतर आसन करावे. त्यातल्या त्यात भुजंगासन जेवायच्या चार किंवा जेवल्यानंतर सहा तासांनी करावे. ह्याने जेवण पचायला वेळ मिळतो आणि जेवल्याने मिळालेल्या ऊर्जेमुळे आसन करायला जास्त सोपे जाते. जेवल्यानंतर शरीरामध्ये गेलेल्या अन्नामुळे भुजंगासन जास्त प्रभावी होते असे एका अर्थी आपण म्हणू शकतो.

भुजंगासन करायची वेळ ही प्रामुख्याने सकाळची असावी. सकाळी केलेल्या योगसाधनेमुळे जास्त फायदा होतो. परंतु काही कारणांमुळे सकाळी करणे शक्य नसल्यास तुम्ही संध्याकाळी देखील हे आसन करु शकता.

भुजंगासन योग्य पद्धतीने कसे करावे ?
१. पोटावर झोपून जा. तुमचे दोन्ही तळवे हे मांड्यांच्या जवळ करुन ठेवा. तुमचे दोन्ही घोटे एकमेकांना स्पर्श करत नाही याची खात्री करुन घ्या.
२. त्यापुढे आपले दोन्ही हात हे खांद्याच्या बरोबरीला आणून दोन्ही तळवे जमिनीवर टेकवा.
३. आता तुमच्या स्वतःच्या शरीराचे वजन तुमच्या तळव्यांवर टाका. श्वास आतमध्ये घ्या आणि डोक वर घेऊन पाठीच्या दिशेने वर उचलायचा प्रयत्न करा. हे करत असताना तुमचे हातांचे कोपर वाकलेले आहेत का याची खात्री करा.
४. यानंतर तुमचं डोकं मागच्या बाजूच्या दिशेने ताणायचा प्रयत्न करुन छातीचा भाग पुढे करा. तुमच डोक एखाद्या सापाच्या फण्याप्रमाणे ताणायचा प्रयत्न करा. तुमच्या खांद्यावर लक्ष ठेवा आणि कान हे खांद्यांपासून लांब राहू द्या.
५. नंतर कंबर, जांघाडे आणि पायांनी जमिनीवर दबाव वाढवायला लागा.
६. ह्या स्थितीमध्ये शरीराला किमान १५ ते ३० सेकंद राहू द्या. हे करत असताना श्वासाचा वेग सामान्य राहू द्या. ह्याने तुमचे पोट जमिनीला स्पर्श करत असल्याचे तुम्हांला जाणवेल. सलग ह्या आसानाचा अभ्यास केल्याने तुम्ही दोन मिनिटांपर्यत हे आसन सलग करु शकता.
७. ही मुद्रा संपवण्याकरिता, हळूहळू आपल्या हातांना आधीच्या पोजिशनमध्ये बाजूला आणा. आपल्या डोक्याखाली हात ठेऊन द्या. डोक्याला ह्याने थोडा वेळ आराम मिळेल. थोड्या वेळानंतर डोक्याला एका बाजूला करुन घ्या. दोन मिनिटांसाठी हळू-हळू श्वास घेऊन तसेच काही वेळ पडून आराम करा.

भुजंगासनाचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत.
१. पाठीच्या मणक्याला मजबूत होण्यास मदत करते. लवचिकता वाढवते.
२. पोटाच्या खालच्या बाजूच्या अवयवांच्या काम करण्याच्या प्रणालीला गतिमान बनवण्यासादी फायदेशीर आहे.
३. पचनक्रिया, मल-मूत्र विसर्जन या संबंधित समस्यांवर मात करता येते. लैगिंक क्षमता वाढू शकते.
४. पचनक्रिया जलदगतीने होते. मेटाबाॅलिजम रेट वाढल्याने वजन कमी करण्यासाठी योग्य योगासन आहे.
५. कंबरेखाली असलेल्या भागाला मजबूत करते.
६. स्ट्रेसमध्ये असल्यास फायदा होतो. भुजंगासनामुळे डिप्रेशन कमी होण्यास मदत मिळते.
७. फुफ्फुस, छाती, खांदे आणि पोटाच्या खालचा भाग ताणला गेल्याने शरीराला फायदा होतो.
८. फुफ्फुस आणि हृदयाच्या नसांमध्ये ब्लाॅकेज असल्यास ते खोलण्यासाठी मदत होते.
९. साइटिका आणि अस्थमा अशा आजारांमध्येही भुजंगासनामुळे फायदा होऊ शकतो.

भुजंगासन करताना कोणती खबरदारी राखाल ?
1. गरोदर स्त्रिया, हर्णिया आणि अल्सरचा त्रास असलेल्यांनी हे आसन करू नये. जर तुमचे नुकतेच पोटाचे ऑपरेशन झाले असेल तर किमान तीन महिने या आसनाचा सराव टाळा.
2. कोणत्याही आसनाचा सराव एखाद्याच्या क्षमतेनुसार केला पाहिजे. त्यामुळे हे आसन करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर त्याचा सराव करू नका.
3. या आसनाचा सराव केल्यानंतर पोटात किंवा शरीराच्या इतर कोणत्याही भागात दुखत असेल तर या आसनाचा सराव थांबवा.
4. जर तुम्हाला अलीकडे शारीरिक जखम किंवा दुखापत झाली असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच या आसनाचा सराव करा.

Share This News

Related Post

Diet

Diet : शरीर अ‍ॅक्टिव्ह आणि निरोगी ठेवण्यासाठी आहाराबाबतचे ‘हे’ नियम पाळा

Posted by - April 14, 2024 0
आपले शरीर अक्टिव्ह आणि निरोगी ठेवण्यासाठी हेल्दी आहार (Diet) आवश्यक असतो. पण फक्त खाद्यपदार्थ जेवणाला हेल्दी बनवत नाहीत. हेल्दी अन्नपदार्थ…
Virabhadrasana

Virabhadrasana : वीरभद्रासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Posted by - March 8, 2024 0
वीरभद्रासन (Virabhadrasana) केल्याने हात, खांदे, मांड्या व पाठीचे स्नायू बळकट बनतात. वीरभद्र नावाच्या आक्रमक योद्ध्याचे नाव ह्या आसनाला दिले गेले…
Utkatasana

Utkatasana : उत्कटासन म्हणजे काय ? काय आहेत त्याचे फायदे?

Posted by - March 7, 2024 0
उत्कटासन (Utkatasana) या आसनाचा नियमित सराव केल्यास आपल्या मांड्यांचे व पोटऱ्यांचे स्नायू मजबूत बनतात. तसेच या आसनाचा नियमित सराव आपला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *