balasana

Balasana : बालासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

243 0

बालासन (Balasana) किंवा चाइल्ड पोज हे योगशास्त्रातील एक विशेष आसन आहे. बाल हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ बालक असा होतो. तर आसन म्हणजे बसणे आणि या दोन शब्दांचा एकत्रित अर्थ म्हणजे लहान मुलासारखी बसण्याची मुद्रा. आईच्या गर्भात बाळाची जी पोजिशन असते, बालासनात शरीर त्याच स्थितीत येते. आईच्या पोटात असताना मूल जन्माला येण्यासाठी ज्या स्थितीत 9 महिने वाट पाहत असते, बालासन करताना योगी शरीराला त्याच स्थितीत आणतात.

बालासन कसे करावे

• योगा मॅटवर गुडघ्याच्या सहाय्यावर बसा.

• दोन्ही पायाची तळवे आणि टाचांना एकत्रित आणा

• हळूहळू आपले गुडघे शक्य तितके पसरवा.

• दीर्घ श्वास घ्या आणि पुढे झुका.

• दोन्ही मांड्यांच्या मध्ये पोट घ्या आणि श्वास सोडा.

• कंबरेच्या मागच्या बाजूच्या भागात त्रिकास्थि (Sacrum)ला  रुंद करा.

• आता नितंबाला वाक देऊन नाभीकडे खेचण्याचा प्रयत्न करा.

• आहे त्या स्थितीत  स्थिर राहा.

• मानेच्या मागे डोके किंचित उचलण्याचा प्रयत्न करा.

• टेलबोनला पेल्विसकडे खेचण्याचा प्रयत्न करा.

• हात समोर आणा आणि आपल्या समोर ठेवा.

• दोन्ही हात गुडघ्यांच्या रेषेत राहतील.

• दोन्ही खांदे जमीनीला स्पर्श करतील यासाठी प्रयत्न करा.

• तुमच्या खांद्याचा ताण शोल्डर ब्लेडपासून पूर्ण पाठीमध्ये जाणवला पाहिजे.

• 30 सेकंद ते काही मिनिटे या स्थितीत रहा.

• हळूहळू हात पुढे ताणत श्वास घ्या.

• पेल्विसला खाली वाकवून टेलबोनला उचला आणि सामान्य स्थितीत परत या.

बालासन करण्याचे फायदे

• बालासन काम किंवा वर्कआउटचा थकवा दूर करते.

• हे आसन तणाव आणि चिंता दूर करण्यास देखील मदत करते.

• बालासन पोटाच्या अंतर्गत अवयवांनादेखील आराम देते.

• या आसनाच्या सरावाने पोटातील अंतर्गत अवयव चांगले काम करतात.

• या आसनामुळे मणक्याला चांगला आराम मिळतो.

• बालासनामुळे पाठ आणि मानेच्या खालच्या वेदना कमी होण्यास मदत होते.

• या आसनामुळे पायांची तळवे, टाचा, नितंब आणि मांड्यामध्ये लवचिकता येते.

• या आसनामुळे संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण वाढते.

• या आसनामुळे टेंडोस, मसल्स आणि गुडघ्यांमध्ये लवचिकताआणण्यास मदत होते.

• बालासनामुळे श्वासोच्छ्वास व्यवस्थित होतो आणि मन शांत होते.

बालासन करण्यापूर्वी लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

• बालासनाचा सराव सकाळी करणे योग्य असते. पण जर तुम्ही हे आसन संध्याकाळी करत असाल तर तुम्ही तुमचे जेवण किमान ४ ते ६ तास आधी करणे आवश्यक आहे.

• आसन करण्यापूर्वी तुम्ही शौच केले आहे आणि पोट पूर्णपणे रिकामे आहे याची खात्री करणे देखील महत्त्वाचे आहे.

• जर तुम्हाला बालासनमध्ये वाकणे अवघड वाटत असेल तर तुम्ही जमिनीवर उशी ठेवू शकता.

• जर तुम्हाला जुलाब किंवा गुडघ्यामध्ये दुखापत होत असेल तर बालासन अजिबात करू नका.

• उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी बालासन अजिबात करू नये.

• सुरुवातीला, केवळ योग प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली बालासन करा.

• एकदा सराव झाल्यानंतर हे आसन तुम्ही स्वतः करू शकता.

• बालासनाचा सराव सुरू करण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Share This News

Related Post

पिंपरी चिंचवड परिसरातील रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने करा – पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील

Posted by - October 21, 2022 0
पुणे : पावसामुळे शहरातील रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे तसेच नादुरुस्त रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करावीत. रस्ते, आरोग्य, पाणी तसेच…
Manoj Jarange

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली;डॉक्टरांनी दिली ‘ही’ माहिती

Posted by - December 11, 2023 0
धाराशिव : सध्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांचा आरक्षणासाठी दौरा सुरु आहे. यादरम्यान त्यांच्याबाबत एक मोठी बातमी…
Uttanasana

Uttanasana : उत्तानासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Posted by - April 2, 2024 0
उत्तानासन (Uttanasana) हा संस्कृत शब्द आहे. याचा शब्दशः अर्थ जोरदार स्ट्रेचिंग असा होतो. या आसनाच्या सरावाने शरीराला काही आश्चर्यकारक फायदे…
Bhujangasana

Bhujangasana : भुजंगासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Posted by - March 2, 2024 0
सूर्य नमस्कारामध्ये एकूण बारा आसने असतात, त्यातील आठवे आसन म्हणजे भुजंगासन (Bhujangasana) होय. भुजंग म्हणजे साप/ नाग. त्यामुळे भुजंगासनाला ‘सर्पासन,…
Sperm

Sperm : पुरुषांमधील स्पर्म काऊंट वाढण्यासाठी ‘या’ बिया ठरतात वरदान

Posted by - August 17, 2023 0
भोपळ्याच्या बिया शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. ह्या बियांचे फायदे ऐकल्यावर तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल. एका संशोधनामध्ये असे सिद्ध झाले आहे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *