Friendship

आजचा दिन विशेष : ‘नॅशनल बेस्ट फ्रेंड डे’, वाचा या दिनाचे महत्व

254 0

जिकडे आपल्या रक्ताची नाती कामी येत नाही तिकडे एक नाते कामी येते ते म्हणजे मैत्रीचे नाते. मैत्रीच्या नात्याला कोणतीच बंधनं लागू होत नाहीत. सुख असो किंवा दु:ख आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ही मैत्री आपल्याला उपयोगी पडते. अशाच मित्रांविषयी प्रेम, आदर व्यक्त करणारा दिवस म्हणजे नॅशनल बेस्ट फ्रेंड डे (National Best Friend Day) चला तर मग जाणून घेऊया या दिवसाचे महत्च आणि इतिहास….

नॅशनल बेस्ट फ्रेंड डेचा इतिहास (History) नेमका काय?
नॅशनल बेस्ट फ्रेंड डे सर्वात आधी 1935 मध्ये साजरा करण्यात आला होता. 1935 मध्ये हा दिवस यूएस काँग्रेसने (US Congress) प्रस्तावित केला होता. हा दिवस जवळच्या मित्रांना श्रद्धांजली तसेच प्रेम अर्पण करण्यासाठी साजरा केला जातो. तेव्हापासून 8 जून हा नॅशनल बेस्ट फ्रेंड डे म्हणून साजरा केला जातो. आज जगभरात हा दिवस साजरा केला जातो.

राष्ट्रीय बेस्ट फ्रेंड डे दिनाचं महत्त्व
आपल्या आयुष्यात मैत्रीचं जे स्थान आहे ते कोणीच घेऊ शकत नाही. कठीण परिस्थितीतही आपल्याला समजून घेणारा, सावरणारा मैत्रीचा हात प्रत्येकासाठी वेगळा असतो. काही लोकांसाठी मैत्री म्हणजे जवळचा मित्र परिवार असू शकतो तर काही लोकांसाठी आपलं कुटुंब हाच त्यांचा मित्र परिवार असतो.

आयुष्यात मैत्री का महत्त्वाची आहे?
भावनिक आधार, आत्मसन्मान वाढवण्यासाठी, प्रामाणिक मत मांडणे यासाठी ही मैत्री खूप महत्वाची मानली जाते. ज्या गोष्टी आपण आपल्या कुटुंबासोबत शेअर करू शकत नाही त्या गोष्टी आपण आपल्या मित्रांसोबत शेअर करू शकतो. मैत्रीला कोणतेही बंधन नसते. बोलतात ज्याच्या आयुष्यात एकही मित्र नसतो तो जगातील सगळ्यात दुर्दैवी व्यक्ती मानला जातो. त्यामुळे आयुष्यात एकतरी मित्र असावा जो आपल्या सुख : दुःखात नेहमी आपल्याला साथ देईल.

Share This News

Related Post

IND Vs AUS Women Cricket

IND Vs AUS Women Cricket : टीम इंडियाने इतिहास रचला ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदाच जिंकला कसोटी सामना

Posted by - December 24, 2023 0
मुंबई : टीम इंडियाच्या महिलांनी आज इतिहास रचला आहे.मुंबईत खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात (IND Vs AUS Women Cricket) भारताने ऑस्ट्रेलियाचा…
World Coconut Day 2023

World Coconut Day 2023 : आज आहे ‘जागतिक नारळ दिन’; जाणून घ्या इतिहास आणि महत्व

Posted by - September 2, 2023 0
बहुपयोगी अशा नारळाच्या झाडाला ‘कल्पवृक्ष’ म्हटलं जातं. कारण नारळाच्या झाडापासून निर्माण होणाऱ्या सर्वच गोष्टी माणसासाठी फार उपयोगी आहेत. नारळाचे महत्त्व…
Neeraj Chopra

Neeraj Chopra : वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्राने रचला इतिहास ! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय एथलिट

Posted by - August 28, 2023 0
भारताच्या नीरज चोप्राने (Neeraj Chopra) अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. नीरजने (Neeraj Chopra) पहिला थ्रो फाऊल…
Chandrayaan-3

Chandrayaan-3 : इतिहास ! इतिहास ! इतिहास ! अखेर भारत चंद्रावर पोहोचला…

Posted by - August 23, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने आज एक मोठा इतिहास रचला आहे. इस्रोचं चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्रावर यशस्वीपणे लँड झालं आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *