Virabhadrasana

Virabhadrasana : वीरभद्रासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

454 0

वीरभद्रासन (Virabhadrasana) केल्याने हात, खांदे, मांड्या व पाठीचे स्नायू बळकट बनतात. वीरभद्र नावाच्या आक्रमक योद्ध्याचे नाव ह्या आसनाला दिले गेले आहे. वीरभद्र हा शिवाचा अवतार मानला जातो. उपनिषदातील सर्व गोष्टींप्रमाणे वीरभद्राच्या गोष्टीमध्येही नैतिक मुल्यांचा समावेश आहे.

वीरभद्रासन म्हणजेच वीर: शूर योद्धा; भद्रा: शुभ; आसन: शरीराची स्थिती.

वीरभद्रासन कसे करावे?
वीरभद्रासन हे एक अत्यंत डौलदार आणि लालित्यपूर्ण आसन आहे. हे आसन आपल्या योगसाधनेत एक मोहकता आणेल.

• सरळ अभे रहा. दोन्ही पायांत 3-4 फूट अंतर असू द्या.

• उजवा पाय 90 अंश बाहेरच्या बाजूस वळवा व डावा पाय 15 अंश.

• हे तपासून पहा: उजव्या पायाची टाच डाव्या पावलाच्या मध्यभागी आहे नां?

• दोन्ही हात उचलून खांद्यांच्या रेषेत आणावे, हाताचे तळवे वरच्या दिशेस.

• हे तपासून पहा: हात जमिनीस समांतर आहेत नां?

• श्वास सोडा आणि उजवा गुडघ्यातून वाका..

• हे तपासून पहा: तुमचा उजवा गुडघा आणि घोटा एका रेषेत आहे का? उजवा गुडघा उजव्या घोटेच्या पुढे नाही ना ह्याची दक्षता घ्या.

• उजवी कडे वळून पहा.

• आसनात स्थिर होताच हात आणखी ताणून घ्या.

• कंबर आणखी थोडी खाली दाबायचा हलकासा प्रयत्न करा. एका योध्याच्या जिद्दीने आसन स्थिर ठेवा. चेह-यावर प्रसन्न भाव असू द्या. खाली वाकताना श्वासोच्छवास चालूच ठेवा.

• श्वास घेत सरळ व्हा.

• श्वास सोडता सोडता दोन्ही हात खाली आणा.

• अगदी अशाच प्रकारे डाव्या बाजूसही करा. (डावा पाय 90 अंश बाहेरच्या बाजूस वळवा व उजवा पाय 15 अंश.)

वीरभद्रासनाचे फायदे

• हात पाय आणि पाठीच्या स्नायूंना बळकटी येते व ते सुडौल बनतात.

• शरीर संतुलित राहते व काम करण्याची क्षमता वाढते.

• बैठी कामे करणाऱ्यांसाठी अतिउत्तम.

• खांद्यांचा ताठरपणावर अतिशय उपयुक्त.

• थोड्याच अवधीमध्ये खांद्यांमधला ताण कमी होतो.

• मांगल्य, धैर्य, कृपा व शांती प्राप्त होते.

वीरभद्रासन करताना घ्यायची दक्षता

• पाठीच्या कण्याचे काही विकार असल्यास किवा नुकतेच दिर्घ आजारातून बरे झाले असाल तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे आसन करावे.

• उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीने हे आसन टाळावे.

• गर्भधारणेच्या दुस-या व तिस-या तिमाही चरणात असलेल्या स्त्रियांना (नियमित योगसाधना करणा-या) विशेष लाभ होतो. भिंतीजवळ उभे राहून हे आसन करू शकता,, असे केल्याने गरज पडल्यास भिंतीचा आधार घेऊ शकता. परंतू हे आसन करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

• तुम्हाला अतिसारचा त्रास असेल तर हे आसन करु नये.

• तुम्हाला जर संधिवात किंवा गुडघे दुखी असेल तर हे आसन करताना गुडघ्यांना आधार द्या.

Share This News

Related Post

Kati Chakrasana

Kati Chakrasana : कटिचक्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Posted by - April 14, 2024 0
कंबरेचं दुखणं, स्लिप डिस्क आणि सायटिकाच्या दुखणं आपल्याला त्रास देतात. तर योगाचे एक असे आसन आहे ज्यामुळे आपल्याला आराम मिळू…
parvatasana-mountain-pose-steps-benefits

Parvatasana : पर्वतासन म्हणजे काय ? काय आहेत त्याचे फायदे?

Posted by - March 21, 2024 0
पर्वतासन हा संस्कृत शब्द आहे. हा शब्द प्रामुख्याने 2 शब्दांनी तयार झाला आहे. पहिला शब्द पर्व म्हणजे पर्वत (अर्धा). तर दुसरा शब्द आसन…
Setu Bandha Sarvangasana

Setu Bandha Sarvangasana : सेतुबंधासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Posted by - March 1, 2024 0
सेतू म्हणजे पूल. या आसनात शरीराचा (Setu Bandha Sarvangasana) आकार पुलासारखा दिसतो म्हणून या आसनास सेतुबंधासन असे म्हणतात. हे एक उपयुक्त…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *