Utkatasana

Utkatasana : उत्कटासन म्हणजे काय ? काय आहेत त्याचे फायदे?

229 0

उत्कटासन (Utkatasana) या आसनाचा नियमित सराव केल्यास आपल्या मांड्यांचे व पोटऱ्यांचे स्नायू मजबूत बनतात. तसेच या आसनाचा नियमित सराव आपला उत्साह व जोम वाढविण्यास मदत करतो. हे आसन करताना आपल्या शरीराचा आकृतिबंध आपण एखाद्या खुर्चीमध्ये बसतो त्या प्रमाणे तयार होतो. त्यामुळे या आसनाला इंग्रजी मध्ये चेअर पोझ असे म्हणतात.

उत्कटासन कसे करावे ?
• सर्वप्रथम आपल्या योग करण्याच्या आसनावर, आपल्या दोन्ही पायांमध्ये काही अंतर ठेऊन सरळ उभे राहा.(साधारणतः 7 ते 9 इंच एवढे अंतर राहूद्या )

• या नंतर आपले दोन्ही हात समोर लांबवून आपल्या खांद्याला समांतर राहतील असे राहू द्या.

• आपले तळहात जमिनीकडे असतील याची काळजी घ्या. वरील आकृतीत दाखविल्या प्रमाणे.

• आता आपण एखाद्या खुर्चीमध्ये बसताना जसे वाकतो तसे वाका.

• असे करताना आपले नितंब मागच्या बाजूला जाईल तसेच आपले गुडघे हे पायांच्या तळव्याच्या पुढे जाणार नाहीत याची काळजी घ्या.

• हि कृती करत असताना आपला श्वासोश्वास निमित्त चालू राहू द्या.

• हे आसन करताना आपल्या मांड्या आपल्या पोटऱ्यांना स्पर्श करणार नाहीत याची दक्षता घ्या.

• या स्थितीत १० ते १५ सेकंद राहिल्या नंतर परत आपल्या पूर्व स्थितीत या.

• या आसनाची किमान २ ते ३ वेळा पुनरावृत्ती करा

उत्कटासन करण्याचे फायदे

• या आसनाच्या सरावामुळे आपल्या मांड्या, पोटऱ्या व घोटे मजबूत बनतात.

• मांड्यांच्या व पोटर्यांच्या स्नायूंना भरपूर व्यायाम मिळून ते मजबूत आणि प्रमाणबद्ध बनतात.

• पाठीच्या आणि कमरेच्या भागावर ताण पडून तेथील स्नायू सुद्धा मजबूत बनतात.

• या आसनाच्या नियमित सरावामुळे पोट सुटत नाही.

• हे आसन करताना शारीरिक तोल सांभाळावा लागतो म्हणून याला तोलासन असे सुद्धा म्हणतात, या आसनाच्या सरावामुळे मन शांत होते, स्थिरावते.

• या आसनाच्या नियमित सरावामुळे शरीर हलके होते व आपला उत्साह वाढतो.

तुम्हाला खालील समस्या असल्यास उत्कटासन करणे टाळा

•  निद्रानाश (Insomnia)

• कमी रक्तदाब  (Low blood pressure)

• डोकेदुखी  (Headaches)

• संधिवात  (Arthritis)

• घोट्याला मोच आलेली   (A sprained ankle)

• तीव्र गुडघेदुखी  (Chronic knee pain)

• खराब झालेले अस्थिबंधन   (Damaged ligaments)

पाठदुखी किंवा खांद्याला दुखापत होत असल्यास या आसनाचा सराव करू नका. सुरुवातीलाच हे आसन खूप अधिक वेळ करण्याचा प्रयत्न करू नका. हे आसन जेवढे आरामात करता येईल तेवढे करा. जर तुम्हाला मानदुखीची तक्रार असेल किंवा आसन करताना आळस वाटत असेल, तर मान सरळ ठेवा आणि समोरच्या एका बिंदूवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Crime News : खळबळजनक ! पुण्यातील बावधनमध्ये कोयत्याने वार करून महिलेची निर्घृणपणे हत्या

Pune News : भारतीय सेना, इंद्राणी बालन फाऊंडेशनमुळे बारामुल्लातील डगर परिवाराच्या विद्यार्थ्याला मिळाले जीवनदान

Sara Ali khan : बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानचा अपघात; व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी एकत्र येणार? शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य

Manoj Jarange : मनोज जरांगेंवर आणखी एक गुन्हा दाखल

Death threat to Navneet Rana : खासदार नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी

Loksabha Election 2024 : संभाजी राजे छत्रपतींची निवडणुकीतून माघार

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड हादरलं ! ठाकरे गटाच्या ‘या’ विभागप्रमुखाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या

Solapur News : कामावर जायला निघाला अन् मरणाच्या दाढेत गेला; मृत्यूचा थरारक Video आला समोर

Loksabha Elections 2024 : भाजप महाराष्ट्रातून किती जागा लढणार? संभाव्य यादी आली समोर

Crime News : ‘या’ भाजप आमदाराच्या पुतण्याची गोळ्या घालून हत्या

Pune Metro : आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गाचे उदघाटन

Shivsena : शिवसेना महिला सेनेचे शिवदुर्गा महिला संमेलन 9 मार्चला होणार

Trikonasana : त्रिकोणासन करण्याचे काय आहेत अद्भुत फायदे ?

Share This News

Related Post

lemon leaves

Lemon Leaves : फक्त लिंबूचं नाहीतर त्याची पाने देखील असतात फायदेशीर

Posted by - August 18, 2023 0
लिंबाच्या पानांमध्ये (Lemon Leaves) अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ज्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. आपण दैनंदिन जीवनात जेवढा वापर लिंबूचा…
Halasana

Halasana : हलासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Posted by - March 20, 2024 0
जेव्हा पृथ्वीवर काहीही नव्हते तेव्हा माणसाने शिकार करून आयुष्याची सुरुवात केली. परंतु नंतर जेव्हा माणूस आदिवासींमध्ये राहू लागला आणि लोकसंख्येनुसार…

Weight Loss : वजन कमी करणं झालं इतक सोपं ; वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ ५ सोप्या टिप्स

Posted by - May 16, 2024 0
तुम्ही अशा जगात वावरता की, जिथे अनेक फिटनेस ट्रेंड येतात आणि जातात; पण निरोगी जीवनशैली जगणे हेच आपले अंतिम ध्येय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *