Vrikshasana

Vrikshasana : वृक्षासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

298 0

आपल्या देशामध्ये योगशास्त्राची निर्मिती हजारो वर्षांपूर्वी झाली. योगासनांच्या (Vrikshasana) नावावरुन या शास्त्रामधील आसनांची प्रेरणा निसर्गातील विविध घटकांकडून घेतल्याचे लक्षात येते. निसर्गामध्ये असलेल्या सजीव-निर्जीव अशा सर्व घटकांकडून प्रेरीत होऊन त्यांचे अनुकरण करत योगशास्त्राचा जन्म झाला असे देखील म्हणता येईल. झाड, पक्षी, प्राणी अशा सजीव जीवांसोबत पर्वत, धनुष्य असे निर्जीव घटक देखील भारतीय योगगुरुंचे प्रेरणास्त्रोत होते.योगशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण आसन म्हणजे वृक्षासन.

वृक्षासनाला इंग्रजी भाषेमध्ये ट्री पोझ Tree Pose असे म्हटले जाते. झाडांच्या स्थितीवरुन प्रेरणा घेऊन या आसनाची रचना करण्यात आल्यामुळे याला वृक्षासन हे नाव पडले. या आसनाचा नियमितपणे सराव केल्यास शरीरामध्ये संतुलन राखले होते. त्यासोबतच सहनशक्ती वाढायला देखील मदत होते. “उजवा पाय डाव्या मांडीवर वरच्या बाजूला ठेवावा आणि जमिनीवर वृक्षाप्रमाणे उभे रहावे याला वृक्षासन असे म्हणतात.”

वृक्षासन कसे करावे?
1) जमिनीवर ताठ उभे राहावे.

2) उजवा पाय वर उचलून गुडघ्यात वाकवून उजवे पाऊल डाव्या मांडीच्या आतल्या बाजूस, जास्तीत जास्त वर असे ठेवावे.

3) दोन्ही हात छातीसमोर नमस्काराच्या स्थितीत ठेवावे. डाव्या पायावर तोल सांभाळावा.

4) दृष्टी सरळ समोर असावी.

5) श्वसन शांतपणे चालू ठेवावे.
30 सेंकद, 1 मिनिट किंवा त्याहीपेक्षा अधिक वेळ हे आसन करता येते.

6) आता हीच कृती उजव्या पायावर तोल सांभाळून करावी.

7) काही साधक हात नमस्काराच्या स्थितीत न जुळविता वर नेऊन एकमेकांना नमस्काराप्रमाणे जोडतात व तोल सांभाळतात.

8) काही जण पाऊल मांडीला न लावता पद्मासनाप्रमाणे मांडीवर समोरच्या बाजूने ठेवतात.

9) अर्थातच या आसनात तोल सांभाळणे महत्त्वाचे आहे.

वृक्षासनाचे फायदे

1) या आसनात शरीराचा तोल सांभाळावा लागतो. त्यामुळे सर्व जाणीवा सजग ठेवाव्या लागतात.

2) अन्य विचार दूर सारले जातात. म्हणून या आसनामुळे मानसिक शांतता व संतुलन उत्तम तऱ्हेने राखले जाते.मनाची चंचलता कमी होते. एकाग्रता वाढते.

3) मानसिक स्थैर्य, संतुलन व एकाग्रता या तिन्ही गोष्टी देणारे हे आसन स्मरणशक्ती उत्तम ठेवण्यासाठीही उपयुक्त आहे.

4) शरीराची तोल सांभाळणारी यंत्रणा, पावले, डोळे व कान यावर अवलंबून आहे.

5) या आसनामुळे ही यंत्रणा चांगल्याप्रकारे कार्यक्षम होते. त्यामुळे रक्तदाब व इतर कार्ये संतुलित होतात.

वृक्षासन करताना या गोष्टी लक्षात ठेवा
सुरुवातीला हे आसन5-10 सेंकदही जमणे कठीण असले, तरी नंतर सरावाने हळूहळू जमू शकते. प्रारंभी भिंतीचा किंवा खुर्चीचा आधार घेऊन हे आसन करता येते. तीव्र मानसिक अस्वस्थता, तोल जाणे, लठ्ठपणा वा अशक्तपणा असेल तर हे आसन करू नये.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Rupali Chakankar: महिला आयोगाच्या सदस्याकडून रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी

Navneet Kaur Rana : नवनीत राणांचं ठरलं ! लोकसभा निवडणूक ‘या’ पक्षाच्या चिन्हावर लढवणार

Pandharpur Blast : पंढरपूरमध्ये भीषण स्फोट; 1 किमी पर्यंतचा परिसर हादरला

Bengaluru Cafe Blast : बंगळुरू हादरलं ! कॅफेमध्ये भीषण स्फोट; 4 जण जखमी

Maratha Reservation : मराठा आरक्षणाविरोधात जयश्री पाटलांकडून हायकोर्टात याचिका दाखल

Buldhana News : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांवर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल

Shinde Group MLA Fight : शिंदे गटाच्या आमदारांमध्ये जोरदार राडा; शंभूराज देसाईंना करावी लागली मध्यस्थी

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केली ‘ही’ नवी मागणी

Maharashtra Politics : ‘जर जरांगे पाटलांनी जालन्यातून लोकसभा लढवली तर रावसाहेब दानवे..’ भाजपच्या ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य

Loksabha Election 2024: ‘मविआ’च्या 48 संभाव्य उमेदवारांची यादी आली समोर

Car Accident : केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन यांच्या ताफ्यातील कारचा भीषण अपघात

Weather Update : ‘या’ जिल्ह्यांत आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

Setu Bandha Sarvangasana : सेतुबंधासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Related Post

Sex

Sex Timing : रात्री नाही तर ‘या’ वेळी सेक्स केला तर शरीराला होतील जबरदस्त फायदे

Posted by - August 13, 2023 0
लैंगिक संबध अर्थात सेक्स (Sex Timing) ही प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील अत्यंत खाजगी गोष्ट. एखाद्या जोडप्यातील नातेसंबध अधिक घट्ट आणि विश्वासपूर्ण…
Bhujangasana

Bhujangasana : भुजंगासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Posted by - March 2, 2024 0
सूर्य नमस्कारामध्ये एकूण बारा आसने असतात, त्यातील आठवे आसन म्हणजे भुजंगासन (Bhujangasana) होय. भुजंग म्हणजे साप/ नाग. त्यामुळे भुजंगासनाला ‘सर्पासन,…
Paschimottanasana

Paschimottanasana : पश्चिमोत्तासन कसे करावे आणि काय आहेत त्याचे अद्भुत फायदे?

Posted by - February 29, 2024 0
पश्चिमोत्तासन (Paschimottanasana) या संस्कृत शब्दाचा एक अर्थ ‘मागे’ असा आहे. ज्या आसनात शरीराची मागची अर्थात पाठीकडची बाजू ताणली जाते त्याला…
Naukasana

Naukasana : नौकासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Posted by - March 9, 2024 0
या आसनात शरीराची रचना तरंगत्या नौकेसारखी भासते म्हणून या आसनाला नौकासन (Naukasana) म्हणतात. हठयोगाच्या प्रमुख ग्रंथात या आसनाचा निर्देश आढळत नाही.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *