Pawanmuktasana

Pawanmuktasana : पवनमुक्तासन करण्याचे काय आहेत फायदे?

357 0

पवनमुक्तासन (Pawanmuktasana) हा शब्द संस्कृतच्या दोन शब्दांपासून बनलेला आहे. यातील पवन म्हणजे हवा आणि मुक्त म्हणजे सोडून देणे असा आहे. या आसनाच्या नावावरुनच स्पष्ट होते की, हे आसन शरीरातील पचनक्षमतेमधून गॅसेसला बाहेर काढण्यात मदत करते. त्यामुळे याला इंग्रजीमध्ये हवा बाहेर काढण्याचे आसन असे म्हटले जाते. पवनमुक्तासन एक उत्कृष्ट आसन आहे, जे पचनक्षमतेचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण मानले जाते.

पवनमुक्तासन करण्याची योग्य पद्धत
1.फरशीवर पोटाच्या आधारे शवासन सारखी स्थिती करुन आरामात झोपा.

2. डावा गुडघा वाकवा आणि जेवढे शक्य होईल तितके त्याला पोटाजवळ नेण्याचा प्रयत्न करा.

3. आता श्वास सोडताना तुमच्या दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंतवा आणि गुडघ्यांच्या खाली ठेवा आणि त्यांच्या सहाय्याने तुमच्या डाव्या गुडघ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.

4. त्यानंतर तुमचे डोके जमिनीवरुन वरच्या बाजूला घ्या आणि गुडघ्यापर्यंत नाकाने स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.

5. डोके वर उचलून आणि नाकाने गुडघ्यांना स्पर्श करुन 10-30 सेकंद याच स्थितीमध्ये रहा आणि हळूहळू श्वास सोडा.

6. आता हीच पूर्ण प्रक्रिया उजव्या पायाने करा आणि 3-5 वेळा हे आसन पुन्हा करा.

साधारणपणे दोन्ही पायांचे गुडघे एकत्र वाकवून हाताची बोटे एकमेकांमध्ये गुंतवून, ​​दोन्ही पायांच्या गुडघ्याखाली ठेवून, गुडघे छातीपर्यंत आणण्याचा सरावही केला जातो. परंतु, तुम्ही तुमच्या सोयीनुसार या दोन मुद्रांपैकी कोणत्याही मुद्रेचा सराव करू शकता.

पवनमुक्तासनचे सर्व स्टेप्स अतिशय काळजीने आणि सावधानतेने करा. तुमच्या बाजूने या आसनामध्ये कोणत्याच प्रकारचे परिवर्तन करु नका. पचनसंस्था सुधारण्यासाठी आणि पोटातील गॅस बाहेर काढण्यासाठी पवनमुक्तासनाच्या सर्व चरणांचा सराव करणे महत्त्वाचे आहे

पवनमुक्तासनाचे फायदे
हे आसन सहसा पोटातील हवा बाहेर काढण्यासाठी केले जाते. यासोबतच हे आसन शरीरात साचलेली अशुद्धता दूर करण्यासाठीही अतिशय फायदेशीर आहे. याशिवाय पवनमुक्तासन करण्याचे अनेक फायदे आहेत.

1. गॅस दूर करण्यात फायदेशीर : पवनमुक्तासन करण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, हे आसन दररोज केल्याने पचनक्षमता तर सुधारतेच शिवाय, पोटातील गॅसेसची समस्या ही दूर होते.

2. महिलांसाठी लाभदायी : हे एक असे आसन आहे की, जे महिलांनी जरुर करायला हवे. विशेष करुन गर्भाशयाची समस्या असलेल्या महिलांना हे आसन करण्याचा सल्ला दिला जातो. हे आसन गर्भाशयाशी निगडीत असलेल्या समस्या दूर करण्यात मदत करते. शिवाय हे आसन स्त्रियांच्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे.

3. कंबरदुखीवर सहाय्यक : जर तुम्हाला सियाटिकाची समस्या असेल किंवा तुमची कंबर दुखत असेल, स्लिप डिस्कचा त्रास जाणवत असेल तर तुम्ही पवनमुक्तासनचा सराव नियमितपणे करायला हवा.

4. आर्थरायटिसमध्ये फायदेशीर : हे आसन अ‍ॅसिडिटी, सांधेदुखी आणि हृदयाच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांसाठीही फायदेशीर आहे. पोटाची नको असलेली चरबी कमी करण्यासाठी पवनमुक्तासन देखील खूप उपयुक्त आहे.

5. आतड्यांसाठी फायदेशीर : पवनमुक्तासन केल्याने आतड्यांची कार्ये अधिक सक्रिय होतात आणि हे आसन अनेक विकारांपासून आतड्यांना दूर ठेवण्यात मदत करते. याशिवाय हे आसन केल्याने यकृतही आपले काम योग्य प्रकारे करते.

पवनमुक्तासन करताना सावधानता बाळगा

1. ज्या व्यक्तीला पाठीच्या दुखण्याची समस्या आहे किंवा कंबरेमध्ये वेदना होत असतील तर त्यांनी पवनमुक्तासन करु नये.

2. जर तुम्हाला उच्च रक्तदाब आणि मानेचा त्रास होत असेल तर पवनमुक्तासन करताना सावधानता बाळगा.

3. जर तुमचे डोके दुखत असेल किंवा छातीमध्ये दुखत असेल किंवा मानेमध्ये काही जुने दुखणे असेल तर हे आसन करु नका.

4. सामान्यपणे हे आसन रिकाम्या पोटीच केले जाते. त्यामुळे पवनमुक्तासन करताना पुरेशी काळजी घ्या.

5. गर्भवती महिलांनी पवनमुक्तासन करु नये.

6. जर तुम्हाला पोटाचा अल्सर असेल तर पवनमुक्तासन करु नका

Share This News

Related Post

Manohar Joshi

Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

Posted by - February 23, 2024 0
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे तीनच्या सुमारास निधन झाले ते…

#HEALTH TIPS : झोपताना तुम्ही करताय का ‘या’ चुका ? आजच तपासा अन्यथा अनेक गंभीर आजारांना मिळते आमंत्रण

Posted by - March 27, 2023 0
झोप आपल्या आरोग्यासाठी आणि संपूर्ण आयुष्यासाठी खूप महत्त्वाची आहे, तरीही त्याकडे सर्वाधिक दुर्लक्ष केले जाते. जर एक रात्र पूर्ण झाली…
Pumpkin Seeds

Depression : ‘या’ फळांच्या बियांचे सेवन केल्याने दूर होईल तुमचे ‘डिप्रेशन’

Posted by - July 12, 2023 0
आजकाल लोकांमध्ये नैराश्याचे (Depression) प्रमाण खूप वाढले आहे. याचा (Depression) परिणाम मानसिक आणि शाररिक आरोग्यावर होताना दिसत आहे. त्यामुळे लोकांचे…
protin Powder

मुलांसाठी घरीच तयार करा ‘हि’ प्रोटीन पावडर; आरोग्य चांगले राहण्यास होईल मदत

Posted by - May 6, 2023 0
पुणे: दूध म्हंटले कि लहान मुले नाक मुरडत असतात. त्यांना ते आवडत नसते. त्यामुळे पालक आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी अनेकदा हेल्थ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *