Paschimottanasana

Paschimottanasana : पश्चिमोत्तासन कसे करावे आणि काय आहेत त्याचे अद्भुत फायदे?

292 0

पश्चिमोत्तासन (Paschimottanasana) या संस्कृत शब्दाचा एक अर्थ ‘मागे’ असा आहे. ज्या आसनात शरीराची मागची अर्थात पाठीकडची बाजू ताणली जाते त्याला पश्चिमोत्तानासन असे म्हणतात. ज्या व्यक्तीचा पाठीचा कणा सुदृढ व लवचिक आहे त्या व्यक्तीला हे आसन सहजसाध्य आहे. आध्यात्मिक उन्नतीसाठी या आसनाचा सराव महत्त्वाचा आहे.

पश्चिमोत्तासन कसे करावे?
दोन्ही पाय एकत्र व सरळ ठेवून ताठ बसावे. या स्थितीला दण्डासन असे म्हणतात. ताठ राहून कंबरेत पुढे झुकावे. पुढे वाकून पायांचे अंगठे पकडावेत. मस्तक सावकाश खाली गुडघ्यांकडे आणावे. शक्य असल्यास कपाळ गुढघ्यांना लावावे. शरीर शिथिल ठेवावे. श्वास कोंडून ठेवू नये. आसन स्थिर आणि सुखद असावे. जबरदस्ती करू नये. 1 ते 3 मिनिटे अथवा क्षमतेनुसार त्याहीपेक्षा जास्त काळ या आसनात स्थिर राहावे. केवळ स्वास्थ्यरक्षण हा सीमित उद्देश असल्यास हे आसन कमी वेळ केले तरी चालेल.आसनातून बाहेर येताना अंगठे सोडून, डोके व धड वर उचलावे. पूर्ववत दण्डासनात यावे. आवश्यकता असल्यास या  आसनाची 2-3 वेळा पुनरावृत्ती  करावी.

पश्चिमोत्तासनाचे फायदे
या आसनात पाठीचा कणा भरपूर ताणला जातो. पोट व ओटीपोट यांवर दाब पडतो. पवन अर्थात प्राणाला सुषुम्नेद्वारा प्रेरणा मिळते. हे आसन नेहमी केल्यास पोट सुटत नाही. सुटलेले पोट  कमी होते, मेरुदंडाची लवचिकता कायम टिकते. खांदे, मांड्या यांचे स्नायुबंध बळकट होतात. पचनशक्ती वाढते. स्त्रियांसाठी तसेच मधुमेही व्यक्तींसाठी हे आसन उपयुक्त आहे. ह्या आसनाचा निरंतर अभ्यास केल्यास स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात. मानसिक शांती व सहनशीलता वाढते. मनाची चंचलता कमी होते. एकाग्रता वाढते.

पश्चिमोत्तासन करताना ‘ही’ काळजी घ्या
हे आसन करताना संबंधित अवयवांना झटके देऊ नयेत. अन्यथा पाठीच्या मणक्यांना दुखापत होण्याची शक्यता असते. अंगठे पकडणे शक्य होत नसेल तर रोज प्रयास करावा. हळूहळू शरीराची लवचिकता वाढून आसन जमू लागते. यास 2 ते 3 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. मात्र पाठीच्या कण्याचे दुखणे असणाऱ्यांनी हे आसन टाळावे. बद्धकोष्ठ, अंतर्गळ (Hernia) इत्यादी  विकार असल्यास हे आसन करू नये.

(साक्षी बासुतकर)

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha Elections 2024 : वंचितने मविआच्या बैठकीत केल्या ‘या’ 4 मागण्या

Accident News : मुंबई अहमदाबाद हायवेवर टँकरने पोलीस व्हॅनला चिरडलं

Manoj Jarange Patil : ‘आता माफी नाही’, भाजपच्या ‘या’ नेत्याने मनोज जरांगेंना दिला इशारा

Rajiv Gandhi : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येत सहभागी असलेल्या आरोपीचा मृत्यू

ST Employees : एसटी कामगारांच्या आंदोलनाला यश; शिंदे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Madhuvanti Patankar : राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांना मातृशोक; मधुवंती पाटणकर यांचे निधन

Shobha Dhariwal : रसिकशेठ यांच्या जन्मदिनानिमित्त शिष्यवृत्ती वितरण व रक्तदान शिबीराचे आयोजन; शोभा धारीवाल

Indian Railways : प्रवाशांना मोठा दिलासा ! रेल्वेच्या तिकीटदरात सरसकट 50 टक्के कपात

Jayant Patil : कुठेही ‘गट’ या शब्दाचा उल्लेख करू नये; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची विनंती

Ashok Saraf : अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर

Fake Currency : पिंपरी चिंचवड पोलिसांकडून बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

NCP Crisis : राष्ट्रवादीत फूट का पडली? अखेर ‘ते’ पत्र आले समोर

Fight Video : बुलेटचा दुचाकीला धक्का लागल्याने तरुणांची पोलिसांसमोरच जबर हाणामारी

Food Poisoning : खळबळजनक ! शालेय पोषण आहाराच्या खिचडीत सापडले मेलेल्या उंदराचे अवशेष; 10 विद्यार्थ्यांना विषबाधा

Share This News

Related Post

Setu Bandha Sarvangasana

Setu Bandha Sarvangasana : सेतुबंधासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Posted by - March 1, 2024 0
सेतू म्हणजे पूल. या आसनात शरीराचा (Setu Bandha Sarvangasana) आकार पुलासारखा दिसतो म्हणून या आसनास सेतुबंधासन असे म्हणतात. हे एक उपयुक्त…
Sperm

Sperm : पुरुषांमधील स्पर्म काऊंट वाढण्यासाठी ‘या’ बिया ठरतात वरदान

Posted by - August 17, 2023 0
भोपळ्याच्या बिया शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. ह्या बियांचे फायदे ऐकल्यावर तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल. एका संशोधनामध्ये असे सिद्ध झाले आहे…

Weight Loss : वजन कमी करणं झालं इतक सोपं ; वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ ५ सोप्या टिप्स

Posted by - May 16, 2024 0
तुम्ही अशा जगात वावरता की, जिथे अनेक फिटनेस ट्रेंड येतात आणि जातात; पण निरोगी जीवनशैली जगणे हेच आपले अंतिम ध्येय…
Bhujangasana

Bhujangasana : भुजंगासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Posted by - March 2, 2024 0
सूर्य नमस्कारामध्ये एकूण बारा आसने असतात, त्यातील आठवे आसन म्हणजे भुजंगासन (Bhujangasana) होय. भुजंग म्हणजे साप/ नाग. त्यामुळे भुजंगासनाला ‘सर्पासन,…
Back Pain

Health Tips : पाठदुखीच्या समस्येने तुम्ही त्रस्त आहात? ‘या’ 6 गोष्टींचा आहारात समावेश केल्याने पाठदुखी होईल दूर

Posted by - August 30, 2023 0
पाठदुखी ही आजकाल एक सामान्य समस्या (Health Tips) बनली आहे. आजकाल बहुतेक लोकांना पाठदुखीची (Health Tips) समस्या भेडसावत आहे. तासन्तास…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *