Dandasana

Dandasana : दंडासन म्हणजे काय ? त्याचे काय आहेत फायदे?

542 0

दंडासन (Dandasana) हा एक संस्कृत शब्द आहे, जो दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे. या दंडासनातील पहिला शब्द दंडा याचा अर्थ होतो छ़डी आणि दुसरा शब्द आसन याचा अर्थ पोझ किंवा मुद्रा होतो. याला इंग्रजीमध्ये स्टाफ पोझ या नावाने ओळखले जाते. दंडासन हा एक प्रकारचा असा सराव आहे की, जो तुमच्या शरीराला विविध हालचाली करण्यासाठी तयार करतो. हे आसन केल्याने तुमच्या शरीराची योग्य हालचाल तर होतेच शिवाय तुमची क्षमता ही वाढते.

दंडासन करण्याची पद्धत
1. दंडासन करण्यासाठी तुम्ही सर्वात आधी योगा मॅटला फरशीवर टाकून त्यावर बसा.

2. दोन्ही पायांना आपल्या शरीराच्या पुढे पसरवा आणि दोन्ही पाय शेजारी ठेवा.

3. दोन्ही पायांची बोटे वाकवून तुमच्याकडे ताणून ठेवा.

4. आपल्या मांड्या आणि टाचा जमिनीवर ठेवा.

5. आपल्या दोन्ही हातांना सरळ आणि पायाच्या तळव्यांना जमिनीवर ठेवा. लक्षात ठेवा तुमचे दोन्ही हात नितंबांच्या जवळ राहिले पाहिजेत.

6. तुमच्या पाठीचा कणा आणि मान सरळ ठेवा.

7. तुमच्या छातीला वरच्या बाजूला घ्या आणि तुमचे कॉलरबोन्स ताणण्यासाठी तुमचे खांदे थोडेसे मागे घ्या.

8. समोर पहा आणि आपला श्वास सामान्य ठेवा.

9. तुम्ही हे दंडासन २० सेकंद ते एक मिनिटांपर्यंत करु शकता. हे आसन तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार देखील करू शकता, यात काहीही नुकसान होणार नाही.

10. आता हे आसन केल्यानंतर पुन्हा तुमच्या सामान्य स्थितीमध्ये या.

दंडासन करण्याचे फायदे
1. खांद्याच्या ताणासाठी फायदेशीर :  कम्प्युटरवर दिवसभर काम केल्याने खांदा आणि छातीमध्ये दुखण्याचा त्रास संभवतो. हे आसन तुमच्या खांद्यांमध्ये तणाव निर्माण करते. ज्यामुळे तुमचा त्रास कमी होतो. दैनंदिन जीवनामध्ये शारिरिक तणाव आणि भावनिक चिडचिड सतत होत असते. याचा परिणाम आपल्या शरीरावर होताना दिसतो. त्यामुळे या शारीरिक आणि भावनिक तणावामुळे होणारे खांदे आणि छातीचे दुखणे बरे करण्यासाठी दंडासन हे एक प्रभावी तंत्र आहे.

2. पाठीचा कणा लवचिक आणि मजबूत करण्यासाठी : पाठीचा कणा हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण, त्याशिवाय माणूस बसू शकत नाही किंवा चालू शकत नाही. पाठीचा कणा आपल्या पाठीला मजबूत संरचना देण्यास मदत करते. दंडासनामुळे आपला पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक बनतो. ही लवचिकता तुम्हाला दुखापतीचा धोका कमी करण्यास मदत करते.

3. मांसपेशींना मजबूत करण्यासाठी : दंडासन हे आपल्या पाठीच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी आणि त्यांना निरोगी ठेवण्यासाठी एक चांगले आसन आहे. बराच वेळ वाकून काम केल्याने किंवा जास्त वेळापर्यंत खुर्चीत बसून काम केल्याने पाठीचे स्नायू हे दुखावले जातात. त्यामुळे हे स्नायू अशक्त होण्याची ही शक्यता असते. दंडासन हे आपल्या पाठीच्या मांसपेशींना आणि स्नायूंना बळकट करण्यासाठी एक उत्तम आसन आहे.

4. सायटिकाच्या समस्येवर लाभदायी : आपल्या शरीराचा खालील भाग जसे, पाय, मांड्या, पोटऱ्या यांमध्ये उद्भवणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी हे आसन लाभदायी आहे. तसेच उंच टाचेच्या हिल्स असलेले सॅंडल्स घातल्याने ही बऱ्याचदा वेदना होतात. त्यावर हे आसन एक चांगला उपाय आहे. तसेच सायटिकाच्या समस्येवर हे आसन रामबाण उपाय आहे.

5. मेंदूला शांत करते :  दंडासनामुळे तुमचा मेंदूही इतर योगासनांप्रमाणे निरोगी राहतो. या मुद्रेच्या नियमित सरावाने स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलचे प्रमाण कमी होते. हे आसन लक्ष केंद्रित करण्यास आणि मन शांत करण्यास मदत करते. यामुळे तणाव कमी होतो आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते.

6. पचनशक्तीला वाढवते : प्रत्येक व्यक्तीच्या सर्वांगीण आरोग्यासाठी चांगले पचन खूप महत्वाचे आहे. बद्धकोष्ठता, ऍसिड रिफ्लक्स आणि ब्लोटिंग सारख्या पचन समस्या अत्यंत असहज आणि अस्वस्थ आहेत. दंडासनाद्वारे या सर्व प्रकारच्या समस्या दूर केल्या जाऊ शकतात.

7. शरीराची स्थिती सुधारण्यासाठी फायदेशीर : कोणत्याही व्यक्तीसाठी सर्वात वेदनादायक काळ तो असतो, जेव्हा तो त्याच्या शरीराच्या अवयवांचा योग्य वापर करू शकत नाही. एखादी व्यक्ती बसलेली आणि उभी असताना शरीराच्या अयोग्य संरेखनामुळे त्याला स्कोलियोसिस, किफोसिस आणि लॉर्डोसिसच्या समस्या होऊ शकतात. दंडासन केल्याने तुम्हाला या रोगांपासून बचाव करण्याचा एक चांगला मार्ग आहे.

दंडासन करताना कोणती सावधानता बाळगावी ?
1. जर तुमच्या पाठीच्या खालच्या भागात जर तुम्हाला वेदना होत असतील तर तुम्ही हे आसन करु नका.

2. तसे पाहिल्यास ही खूप सरळ मुद्रा आहे. परंतु, तुम्ही योग प्रशिक्षकाच्या देखभालीमध्ये हा सराव उत्तम प्रकारे करु शकता.

3. योगासनाला तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात करण्याचा प्रयत्न करु नका. जेवढं तुम्हाला जमेल तेवढचं तुम्ही करा.

4. दंडासन सुरु करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.

5. उच्च रक्तदाबाच्या व्यक्तींनी हे योगासन करु नये.

6. या आसनाचा सराव करताना एका गोष्टीची काळजी घ्या की तुम्ही ज्या जागेवर आसन करणार असाल ती जागा घसरणारी किंवा पडणारी नसावी.

Share This News

Related Post

Paschimottanasana

Paschimottanasana : पश्चिमोत्तासन कसे करावे आणि काय आहेत त्याचे अद्भुत फायदे?

Posted by - February 29, 2024 0
पश्चिमोत्तासन (Paschimottanasana) या संस्कृत शब्दाचा एक अर्थ ‘मागे’ असा आहे. ज्या आसनात शरीराची मागची अर्थात पाठीकडची बाजू ताणली जाते त्याला…
Utkatasana

Utkatasana : उत्कटासन म्हणजे काय ? काय आहेत त्याचे फायदे?

Posted by - March 7, 2024 0
उत्कटासन (Utkatasana) या आसनाचा नियमित सराव केल्यास आपल्या मांड्यांचे व पोटऱ्यांचे स्नायू मजबूत बनतात. तसेच या आसनाचा नियमित सराव आपला…
Pumpkin Seeds

Depression : ‘या’ फळांच्या बियांचे सेवन केल्याने दूर होईल तुमचे ‘डिप्रेशन’

Posted by - July 12, 2023 0
आजकाल लोकांमध्ये नैराश्याचे (Depression) प्रमाण खूप वाढले आहे. याचा (Depression) परिणाम मानसिक आणि शाररिक आरोग्यावर होताना दिसत आहे. त्यामुळे लोकांचे…
Milk

Milk : दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?

Posted by - November 23, 2023 0
दूध (Milk) प्यायल्याने शरीराला आवश्यक ते पोषकतत्वे मिळतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच दूध पिण्याचा सल्ला डॉक्टरकडून दिला जातो. दूध प्रत्येकाच्याच…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *